why was Ishan Tharoor laid off from Washington Post 
देश विदेश

Layoff : काँग्रेस खासदाराच्या मुलाला नोकरीवरून काढलं, नेमकं कारण काय?

why was Ishan Tharoor laid off from Washington Post : वॉशिंगटन पोस्टने जगभरातील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले असून काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा मुलगा इशान थरूर याचाही समावेश आहे. या निर्णयामुळे जागतिक पत्रकारितेत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Namdeo Kumbhar

Washington Post layoffs : काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या मुलाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेय. जगातील सर्वात प्रतिष्ठित वृत्तमानपत्र असलेल्या वॉशिंगटन पोस्टने ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलेय. त्यामध्ये शशी थरूर यांचा मुलगा इशान थरूर याचाही समावेश आहे. त्याने एक्स (ट्विटर) खात्यावर नोकरी गेल्याबाबत माहिती दिली. जगभरातील ३०० कर्मचाऱ्यांना ईमेलवर नोकरीकपातीची माहिती दिली.

वॉशिंगटन पोस्टने नोकरकपात केल्याच्या निर्णयामुळे जागतिक पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेकांना याचा धक्का बसलाय. वॉशिंग्टन पोस्टचे माजी रिपोर्टर अॅशले पार्कर यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. वॉशिंगटन पोस्ट हे १५० वर्षांपासून अमेरिकन लोकशाहीचा आधारस्तंभ राहिलाय. ऐतिहासिक वारसा राहिलेल्या वृत्तपत्राची सध्याची परिस्थिती त्याच्या वारशाला गंभीरपणे धोका निर्माण करणारी आहे. त्याशिवाय मॅट मरे यांनी या निर्णयाला वेदनादायक पण आवश्यक असल्याचे म्हटलेय.

वॉशिंगटन पोस्टने जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी एक तृतीयांश म्हणजे, जवळपास ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला. यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या मुलाचा समावेश आहे. इशान थरूर हे वॉशिंगटन पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तंभलेखक म्हणून कार्यरत होते. इशान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. जागतिक पत्रकारितेसाठी अतिशय दु:खद दिवस असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.

इशान याने वॉशिंगटन पोस्टमधील रिकाम्या न्यूजरूमचा फोटो पोस्ट केला. त्याशिवाय हा सर्वात दु:खद दिवस असल्याचे म्हटलेय. इशान यांनी २०१७ मध्ये वर्ल्डव्ह्यू नावाचा कॉलम वॉशिंगटन पोस्टसाठी सुरू केला होता. त्याबाबत थोडक्यात सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, वॉशिंगटन पोस्टनेही कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काढून टाकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. आंतरराष्ट्रीय ब्युरो आणि क्रीडा सेक्शन त्यांनी पूर्णपणे बंद केले आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे, काही रिपोर्टर आणि संपादकांनाही त्यांनी घरचा रस्ता दाखवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर आज ठरणार

Kokan Railway News : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? मुंबईतून विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक काय? तिकीट बुकिंग कधी करता येणार?

Hair Care : गरम पाण्याने केस धुतल्याने काय परिणाम होतो? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! eKYC करताना ७१० लाडक्या बहिणींची एक चूक झाली अन् ₹१५०० कायमचे बंद झाले, लिंग निवड करताना...

Pune News: अर्ध्या पुण्याची आज बत्ती गुल, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT