vladimir putin  Saam Tv
देश विदेश

'पुतिन'ने विषबाधेच्या भीतीने 1 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या हत्येची भीती वाटत आहे.

साम वृत्तसंथा

मॉस्को: रशियाचे (Russai) राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपले खासगी एक हजार कर्मचारी काढून टाकले आहेत. पुतिन यांना हे कर्मचारी विषबाधा करतील अशी भीती होती. त्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले असल्याचे बोलले जात आहे. कामावरुन कमी केलेल्यांमध्ये बॉडीगार्ड, कुक, कपडे धुणारा तसेच सचिवांचाही समावेश आहे. पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी की नंतर याची माहिती मिळालेली नाही.

रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर जगभरात पुतिन यांचा निषेध व्यक्त केला आहे. अनेक देशांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांवर बंदी घातली आहे. यासह रशियावरही अनेक देशांनी निर्बंध घातले आहेत.

विषबाधेचा प्रयत्न होऊ शकतो

अमेरिकेचे दक्षिण कॅरोलिनाचे खासदार लिंडसे ग्रॅहम हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येबद्दल बोलले आहेत. ग्रॅहम यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पुतीन यांची तुलना हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केली होती. युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोणीतरी पुतिनला मारणे अस लिंडसे ग्रॅहम म्हणाले होते. पुतिनला (vladimir putin) विष पाजण्याचे किंवा त्यांना मारण्याचे काम कोणतेही विदेशी सरकार करणार नाही. रशियन अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनमधून याचा प्रयत्न होऊ शकत, असही ते म्हणाले होते.

पुतीन (vladimir putin) यांना विषबाधा करण्यात येणार हे वृत्त निराधार नाही, कारण अधिकारी पुतीन यांना "विष" देण्याचा कट रचत आहेत. आणि याला अपघात दाखवणार असल्याचे समोर आले आहे. रशियातील (Russia) एका गटाने पुतीन यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची आणि त्यांच्या जागी उत्तराधिकारी उभा करण्याच्या तयारीत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

Edited By - Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! 24 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना मृत्यूदंडाची शिक्षा; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त; खंडव्याचा प्रवासी ताब्यात

Kalyan News: गरोदर नसतानाही प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह, KDMC रुग्णालयात धक्कादायक प्रकार; पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

आता सुटका नाहीच! दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर होणार 'मकोका' अंतर्गत कारवाई

तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

SCROLL FOR NEXT