VETERAN BJP LEADER VIRENDRA PAL SINGH YADAV DIES; SCHOOLS SHUT IN SHAHJAHANPUR saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

Virendra Pal Singh Yadav Death Shahjahanpur Former BJP District President: शाहजहांपूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष वीरेंद्र पाल सिंह यादव यांचे निधन. त्यांच्या निधनानंतर अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून कार्यक्रम रद्द करण्यात आले.

Omkar Sonawane

शाहजहांपूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष तसेच फूल सिंह शिक्षा निकेतन इंटर कॉलेज, नियामतपुरचे व्यवस्थापक वीरेंद्र पाल सिंह यादव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली असून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी ही मोठी हानी मानली जात आहे.

एमए पब्लिक स्कूल मुडिया मोड, ग्लोरियस मायनॉरिटी पब्लिक स्कूल आणि लिटिल स्कॉलर कॉन्व्हेंट स्कूलचे व्यवस्थापक मोहम्मद आसिफ अली मंसूरी यांनी वीरेंद्र पाल सिंह यादव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच बुधावरी सर्व शाळांना जाहीर केली. मंसूरी म्हणाले की, विरेन्द्र पाल सिंह यादव परिसरातील लोकप्रिय नेते होते. त्यांच्यासाठी ते वडीलधारी होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातील नागरिकांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे.

शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, आज दुपारी त्यांच्या निधनानंतर सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आणि सर्व शिक्षकांची शोकसभा आयोजित करण्यात आली. यामध्ये विरेन्द्र पाल सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच एमए पब्लिक स्कूलमध्ये आज होणारे सिंबल ऑफ एक्सलन्स लायब्ररीच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही त्यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आला आहे. तसेच पुढील कार्यक्रमाची पुढील तारीख देखील जाहीर केली जाणार आहे. याचदरम्यान राम बहादूर त्रिपाठी ज्युनिअर हायस्कूल लालपूर येथे विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास शांतीसाठी प्रार्थना केली. वीरेंद्र पाल सिंह यादव यांच्या निधनामुळे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राची अपूरणीय हानी झाल्याचे शाळा परिवाराने म्हटले.

यावेळी जीएम पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका इरम मंसूरी, सहायक व्यवस्थापक अब्दुल रहमान खान, लायब्ररी प्रभारी कृष्ण पाल, करुणा शंकर पांडे, जितेंद्र कुशवाहा, शिस्त प्रभारी ऋषभ पाल, ओमवीर यादव, शोएब खान, आदित्य चौहान, बृजेश कुमार, आसना चौहान, पल्लवी राठौर, अंजू देवी, रीता चौहान, अन्या शुक्ला, शिवांगी वर्मा, अंचल त्रिवेदी, अनामिका सिंह, सोनम मिश्रा, अंजली पाल, नेहा सिंह, रोमाना खान, गुलफ्शा अंसारी, रुची सिंह, रिया मिश्रा, आरती, रेनू सिंह, संदीप प्रजापती, साक्षी, फैजान खान, आदिल, शिवम आणि योगेश कुमार यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी

Maharashtra News Live Update: कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का

SIM Card: सिम कार्ड दुसऱ्याला देणं पडेल महागात, ५० लाखांचा दंड अन् ३ वर्षांचा तुरुंगवास

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ वाढत असताना दिसणारं पहिलं लक्षण कोणतं? या 6 लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना! CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा मृत्यू; बाथरूममध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT