तालिबान्यांचा नवीन व्हिडीओ|पार्कमध्ये जाऊन खेळतायत, गाड्यांवर मस्ती करतायत Saam Tv News
देश विदेश

तालिबान्यांचा नवीन व्हिडीओ|पार्कमध्ये जाऊन खेळतायत, गाड्यांवर मस्ती करतायत

सध्या तालिबान्यांचा एक आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात तालिबानी एका पार्कमध्ये इलेक्ट्रीक बंपर कारमध्ये आनंद घेतायत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानचा आत्मविश्वास शिगेला पोहोचलाय. लोकांमध्ये स्वतःची दहशत पाहून तालिबान्यांना भलताच आनंद होतोय. अफगाणिस्तानातून दररोज तालिबानच्या कृरतेचे अस्वस्थ करणारे व्हिडीओ समोर येत आहेत. मात्र सध्या तालिबान्यांचा एक आगळा वेगळा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात तालिबानी एका पार्कमध्ये इलेक्ट्रीक बंपर कारमध्ये आनंद घेतायत. (viral video: talibani's are playing with bumper car in park)

हे देखील पहा -

मॉलमध्ये किंवा पार्कमध्ये लहान मुलांच्या खेळण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रीक बंपर कारमध्ये आता तालिबानी दहशतवादी बसले आहेत. या इलेक्ट्रीक बंपर कारमध्ये एकमेकांना ठोकर मारत तालिबानी विजयाचा आनंद साजरा करताना दिसतायत. हा व्हिडीओ पाहुन आश्चर्याचा धक्का लागल्याशिवाय राहत नाही. कृर आणि आक्रमक असलेल्या तालिबानी सैनिक लहान मुलांप्रमाणे बंपर कारचा आनंद लुटतायत हे नवलंच आहे. कालच विमानाला लटकलेल्या दोघांचा खाली पडून मृत्यू झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर काबुल विमानतळावरील गोळीबार आणि गोंधळाचा व्हिडीओ समोर आला. हे सर्व अस्वस्थ करणारे व्हिडीओ होते. मात्र या व्हिडिओत तालिबान्यांचं सेलिब्रिशन दिसतंय.

रविवारी १५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलही ताब्यात घेतली होती. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशातून पलायन केले होते. सध्या काबुलचे विमानताळ ५ हजार अमेरिकन सैनिकांनी ताब्यात घेतले असून अमेरिकन नागरिकांचे रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे. भारतानेही आपल्या नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी विमानं पाठवली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT