बेंगळुरूतील एका कार अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  saam tv
देश विदेश

Viral Video : सोसायटीत रात्री पावणेदोनला थरार, भरधाव कारने गेटला दिली जोरदार धडक; दैव बलवत्तर म्हणून वॉचमन थोडक्यात बचावला

viral video speeding car crashes into bengaluru society gate : बेंगळुरूत एका सोसायटीच्या गेटला भरधाव कार धडकली. रात्रीच्या वेळेस हा थरारक अपघात घडला. गेटसमोर आलेला सुरक्षारक्षक थोडक्यात बचावला. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

रात्री १.४२ ची वेळ. मध्यरात्रीची वेळ असल्यानं परिसरात शांतता होती. अचानक मोठा आवाज झाला. एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव होती अन् ती सोसायटीच्या गेटवर जोरात धडकली. धक्कादायक म्हणजे गेटसमोर आलेला सुरक्षारक्षक या कारच्या कचाट्यात सापडणारच होता, पण दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. या थरकाप उडवणाऱ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेंगळुरूतील ही घटना आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रात्री १.४२ मिनिटांनी ही घटना घडल्याचे दिसते. एक सफेद रंगाची कार सोसायटीच्या गेटला जोराने धडकली. गेटवर तैनात असलेला सुरक्षा रक्षक यातून थोडक्यात बचावला. कार वेगाने त्याच्या दिशेने येत असल्याचे दिसताच, प्रसंगावधान राखून सुरक्षा रक्षक बाजूला झाला. त्याचवेळी तो धडपडला. कारसमोर पडला. पण कोलांटीउडी घेत त्यानं स्वतःचा जीव कसाबसा वाचवला. या सुरक्षारक्षकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना कुठे घडली, सोसायटी कुठली आहे आणि कार कुणाची होती, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.

बेंगळुरू पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून, सोसायटीचे ठिकाण नेमके कुठे आहे, कार आणि चालक कोण होता, याबाबतची माहिती घेतली जात आहे. ही कार गेटजवळ आल्यानंतर अनियंत्रित का झाली किंवा चालकाचा कारवरील ताबा सुटला का? असे अनेक प्रश्न हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेची सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

(कार अपघाताचा व्हिडिओ बघा )

सुरक्षेचा प्रश्न गंभीर

या घटनेने सोसायटीच्या गेटवर रात्रभर पहारा देऊन रहिवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या गंभीर प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ बघून एका नेटकऱ्याने त्या सुरक्षा रक्षकाचे कौतुक तर केलेच, पण त्याचबरोबर मजेशीर प्रतिक्रियाही दिली. अॅक्टिंग आणि जम्पिंगचे स्किल त्याला एकाच वेळी दाखवायचे होते, असे त्या नेटकऱ्याने म्हटले. तर ग्रेट रिअॅक्शन टाइम अशी प्रतिक्रिया आणखी एका नेटकऱ्याने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live Update : आयोगाने आमदारांच्या फुटीलाच पक्षातील फूट मानले, जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही - सिब्बल

पुण्यात ब्रिटनहून आलेला 'तो' धर्मगुरू अन् चर्चमधील 'ते' रहस्यमय प्रवचन! नव्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई

Maharashtra News Live Update: केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक; दरात मोठी घसरण

Suvendu Adhikari: उड्डाण भरताच तांत्रिक बिघाड; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

ना गाडी, ना ट्रेन...थेट १ हजार किलोमीटर पायी प्रवास! महाराष्ट्रातून निघालेल्या 'या' चाहत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT