Bunji Jumping Saam TV
देश विदेश

Viral Video : बंजी जम्पिंगचा थरारक व्हिडीओ; महिलेने शेकडो फुटांवरून उडी घेतली, अन् दोरीच तुटली...

तुमच्याही बकेट लिस्टमध्ये बंजी जम्पिंग असेल तर आधी व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहा.

प्रविण वाकचौरे

Viral Video: सोशल मीडियावर बंजी जम्पिंगचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. बंजी जम्पिंगचा थरार अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते. तुमच्याही बकेट लिस्टमध्ये बंजी जम्पिंग असेल तर आधी व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहा.

बंजी जम्पिंगचे व्हिडीओ पाहताना अनेकांच्या मनात एक गोष्ट नक्की येत असेल, ती म्हणजे ही दोरी तुटली तर. पण खरंच ही दोरी तुटली तर काय होत असेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात शेकडो फूट उंचीवरुन एक महिला उडी घेते आणि दोरीच तुटते. (Latest News)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला शेकडो फूट उंचीवरून बंजी जंपिंगची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आली आहे. मात्र पुढे काय होणार आहे याची पुसटशी कल्पना तिला नव्हती. दरम्यान एक माणूस महिलेला उंचीवरून धक्का देतो आणि महिला खाली जाते.

महिला खाली पडत असताना बंजी जंपिंग दोरी तुटून महिला थेट पाण्यात पडली. या अपघातात महिलेला किती दुखापत हे सांगणे कठीण आहे. मात्र पाणी असल्याने तिची जीव वाचण्याची शक्यता आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर असा रोमांच अनुभवायचा असल्यास सुरक्षा देखील महत्त्वाची असल्याचे अधोरेखित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT