Airplane accident Saam tV
देश विदेश

Airplane Accident: विमानाची ट्रकला धडक, रनवेवर बर्निंग प्लेनचा थरार; पाहा VIDEO

सुदैवानी विमानातील सर्व सुखरुप असून कुणालाही दुखापत झाली नाही.

साम टिव्ही ब्युरो

Airplane Accident : पेरूमधील लिमा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवर टेक ऑफ करताना एक भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीवर असलेल्या अग्निशमन गाडीला धडकलं. या घटनेत दोन अग्निशमन जवानांचा जागीच मृत्यू झाला. या जोरदार धडकेनंतर विमानाने पेट घेतला आणि काही अंतरावर जाऊन थांबलं. सुदैवानी विमानातील सर्व सुखरुप असून कुणालाही दुखापत झाली नाही.

या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला विमानाला मागील बाजूने आग लागल्याचे दिसत आहे. विमान थांबलं तेव्हा आजूबाजूला धुराचं साम्राज्य दिसत होतं. विमान फायर इंजिनला धडकले त्यावेळी या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 108 प्रवासी होते. हे विमान पेरूच्या LATAM एअरलाइन्सचे होते.  (Latest Marathi News)

विमानाची आणि फायर इंजिनची धडक झाल्यानंतर विमानाने तत्काळ पेट घेतला. पेटतं विमान धावपट्टीवरुन धावतांना दिसत होतं. आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर असं थरारक दृष्य धावपट्टीवर दिसत होतं. मात्र वैमानिकाने प्रसंगावधाना दाखवत विमान काही अंतरावर थांबवलं आणि सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

या घटनेची माहिती देताना LATAM एअरलाइन्सने आपल्या वेबसाईटवर शोक व्यक्त केला. तसेच या अपघातामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी नेण्यासाठी आणखी एका विमानाची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी त्यांना कोणतेही अतिरिक्त भाडे द्यावे लागणार नाही, असे एअरलाइन्सने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT