Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News: वा रे पठ्ठ्या! दिल्ली मेट्रोत तरुणाने लगावले ठुमके; प्रवासी एकटक बघतच राहिले; पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर सध्या मेट्रोमधील तरुणाचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तु्म्हीही एकदा तरुणाचा डान्स व्हिडिओ पाहाच.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boy Dance In Metro: दिल्ली मेट्रोचे सोशल मीडियावर कायम एक तरी व्हिडिओ पाहण्यास मिळतो. असा एकही दिवस होत नाही ज्यात दिल्ली मेट्रोची चर्चा होत नसेल. कधी प्रवाशांची हाणामारी होते तर कधी प्रवाशांच्या अनोख्या कारनाम्यामुळे दिल्ली मेट्रो नेटकऱ्यांच्या नजरेत येते. सध्या पुन्हा एका सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोची जोरदार चर्चा होत आहे. ज्यात प्रवाशांनी भरलेल्या गर्दी तरुणीने नाही तर अशा एकाने ठुमके लगावले आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येतेय. पुढे दिल्ली मेट्रोतील प्रवाशांनी भरलेला मेट्रोच्या आतील भाग दिसत आहे. जिथे अनेक प्रवाशी सीटवर बसलेले आहेत तर अनेक तरुण उभे आहेत. अशातच एका तरुण आहे जो प्रवाशांच्या शांत असलेल्या वातावरण हिंदी गाणं लावतो. मग काय जो व्हिडिओत तरुण दिसत आहे. जो ''नाचो नाचो'' या फेमस गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करतो. डान्स करताना तरुणाचा उत्साह तुम्हाला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून दिसून येईल. तरुणाला डान्स करताना पाहून मेट्रोमधील(Metro) प्रवाशी हसताना दिसत आहे तर अनेकांना मध्येच हे काय सुरु झाले असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

तरुणाचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. परंतू तो तुम्हाला इन्स्टाग्रामवरील ''@laughwithsachi'' या अकाउंटवर पाहता येणार आहे. व्हिडिओ करत कॅप्शनमध्ये,''नाचो नाचो'' असे इंग्रजीत लिहिले आहे. एवढेच नाही तर या अकाउंटवर तरुणाचे अनेक डान्स व्हिडिओ आहे आणि त्याही व्हिडिओजना लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांची पसंती असलेली दिसत आहे.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

तरुणाने डान्स व्हिडिओ साधारण पाच दिवसापूर्वी त्याच्या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. याच पाच दिवसात व्हिडिओला तब्बल हजारोहून अधिक लाईक्स मिळाले आहे तर अनेक व्ह्यूजही येत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'भावा तू तर मस्त मज्जा घेत आहेस' तर दुसऱ्या एकानेही तरुणाच्या डान्सचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

SCROLL FOR NEXT