Viral Video News Saamtv
देश विदेश

Viral Video: आलिया गावात अजब वरात! नवरदेव घोड्यावर अन् घोडा खाटेवर, हटके मिरवणूकीची होतेय सर्वत्र चर्चा; VIDEO तुफान VIRAL

Uniq Viral Video: हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले असून लग्नाचे असेही काही विधी असतात माहित नव्हतं, अशा जबरदस्त प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत.

Gangappa Pujari

Groom Viral Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो. हा क्षण आनंदाने तसेच हटके स्टाईलने साजरा करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सध्या अशाच एका हौशी नवरदेवाच्या वरातीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ज्यामधील वरातीची स्टाईल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या वरातीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, लग्नामध्ये केल्या जाणाऱ्या विविध परंपरा आणि अनोख्या प्रथांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या आणि हटके गोष्टी लग्नामध्ये पहायला मिळतात. लग्नाच्या अशाही प्रथा परंपरा अस्तित्त्वात आहेत ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. अशातच लग्नातील आणखी एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असलेला व्हिडिओ एका वरातीचा असून यामध्ये नवरदेवाला घोड्यावर अन् घोड्याला थेट खाटेवर चढवल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हेतर खाटेवर चढलेल्या घोड्याला अन् नवरदेवाला गरगर फिरवल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवाला घोड्यावर बसवलं असून घोड्यालाही खाटेवर चढवलं आहे. नंतर घोड्यासह नवरदेवाला घेऊन गोल गोल फिरवलं. मिरवणुकीमधील हा हटके अंदाज पाहून सर्वच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. अजब वरातीचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

सोशल मीडियावर ravirajsinh_rajput_0007 नावाच्या (Instagram) अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळात हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलेला पहायला मिळाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत. अनेक मजेशीर कमेंट येत आहेत. लग्नाचे असेही काही विधी असतात माहित नव्हतं असंही काहींनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT