Shocking Video Saam Tv
देश विदेश

Shocking Video: मिठाईवर फिरताना आढळला उंदीर; दिल्लीच्या प्रसिद्ध स्वीट शॉपमधील धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका मिठाई शॉपमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एका मिठाईच्या दुकाना मिठाईवर फिरताना उंदीर दिसून आलेला आहे.

Tanvi Pol

Rat Runs Over Sweets: कोणताहा सण असो वा कोणतेही शुभ कार्य तो क्षण गोड पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. जर गोड पदार्थाचे नाव काढताना आपल्यापैंकी अनेकजणांना गोड मिठाई खाण्यास आवडते. सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धुम पाहण्यास मिळत आहे. या निमित्ताने अनेकजण मोठ-मोठ्या मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी करत आहेत. परंतू सोशल मीडियावर मिठाई संंबंधित एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एका मिठाईच्या दुकानात चक्क मिठाईवर एक उंदीर धावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, एक मिठाईचे दुकान दिसून येत आहे. मिठाईच्या (Sweet) या दुकानात अनेक ग्राहक घेत आहेत, अशातच एक व्यक्ती मोबाईल काढून एक व्हिडिओ रिकॉर्ड करत असतो, त्या व्हिडिओत तो मिठाईच्या दुकानात विकण्यासाठी ठेवलेल्या रसगुल्ला या मिठाईवर एक लहानसा उंदीर (rat)फिरताना दिसत आहे. व्हिडिओत पुढे उंदीर अनेक मिठाईवरुन तो उंदीर पळताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर यापूर्वीही हॉटेलमध्ये मिळणाऱ्या जेवणात असो वा रेल्वेमध्ये शिवाय मिठाईच्या दुकानातील पदार्थांत मेलेले तर कधी जिंवत उंदीर आढळून आलेले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की दिल्लीमधीलच आहे की नाही शिवाय दिल्लीमधील कोणत्या शॉपमधील आहे. एवढेच नाही तर खरंच मिठाईच्या दुकानात उंदीर मिठाईवर फिरताना आढळला आहे हे खरे आहे हे समजू शकलेले नाही. मात्र सोशल मीडियावर या व्हिडिओची तूफान चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ''@trolls_officia'' या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की,''चाचणी कालावधी चालू आहे'' असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने कमेंट केली आहे की,''दाने दाने पे लिखा हैं चूहे चूहे का नाम'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''दुकानाचा मालक प्राणीप्रेमी आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: महिलेने धावत्या कॅबमध्येच केली लघवी; ड्रायव्हर भडकताच दोघांमध्ये मोठा वाद, व्हिडीओ व्हायरल

४ दिवस पावसाचे! पुण्यात अचानक गारांचा तडाखा, कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट

Politics News: १२ महासचिव अन् ८ सचिव; NDAच्या घटक पक्षात उलटफेर; अख्ख्या राष्ट्रीय कार्यकारणीत मोठा फेरबदल

Weight Loss Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा डाएट इडली; फक्त टाका 'हा' एक पदार्थ, वजन वेगाने होईल कमी

Bollywood Stories: मरण्याचा सीन करताना अभिनेत्याचा मृत्यू; प्रेक्षक अभिनय पाहून टाळ्या वाजवत राहिले

SCROLL FOR NEXT