BRAZIL BUNGEE JUMP TRAGEDY: 21-YEAR-OLD MARIA FREITAS DIES AFTER SAFETY ROPE WAS NOT ATTACHED Saam tv
देश विदेश

Video : बंजी जंपिंगची हौस जीवावर बेतली! सुरक्षा दोर तुटला अन् २१ वर्षीय तरुणी १३० फूट दरीत कोसळली

Brazil Bungee Jump Accident News : ब्राझीलमध्ये बंजी जंपिंगदरम्यान भीषण दुर्घटना घडली. सुरक्षा दोरी न जोडल्याने २१ वर्षीय तरुणीचा १३० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली.

Alisha Khedekar

  • ब्राझीलमध्ये बंजी जंपिंगदरम्यान 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

  • सुरक्षा दोरी न जोडल्याने ती सुमारे १३० फूट खोल दरीत कोसळली

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • ६ जणांना अटक

ब्राझीलमध्ये साहसी खेळादरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. बंजी जंपिंगचा थरार अनुभवण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीचा सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे साहसी खेळांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मारिया एडुआर्डा रॉड्रिग्ज डी फ्रिटास असे मृत तरुणीचे नाव असून ती ब्राझीलमधील ग्रेटर साओ पाउलो परिसरातील जंदिरा येथील रहिवासी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साओ पाउलो राज्यातील लिमेइरा भागात असलेल्या प्रसिद्ध 'सांगाडा पूल' येथे मारिया बंजी जंपिंगसाठी गेली होती. साहसी खेळांची आवड असलेल्या मारियाने उत्साहात उडी मारण्याची तयारी केली होती. मात्र, आयोजकांकडून झालेल्या एका गंभीर चुकीमुळे तिच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला.

माहितीनुसार, मारियाला उडी मारण्यास सांगण्यात आले, परंतु तिची सुरक्षा दोरी व्यवस्थित जोडण्यात आलेली नव्हती. तिने प्लॅटफॉर्मवरून उडी घेताच ती थेट सुमारे १३० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, उडी मारण्याच्या काही मिनिटांपूर्वी मारियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. "मला पुलावरून उडी मारण्याची परवानगी देणारा तो वेडा माणूस कोण होता?" असे तिने लिहिले होते. मात्र, हीच तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ठरली. तिच्या निधनानंतर काही तासांतच तिचे इन्स्टाग्राम खाते बंद करण्यात आले.

या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मारिया उडी मारताच उपस्थितांना सुरक्षा दोरी जोडलेली नसल्याचे लक्षात येते. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाल्याचे दिसून येते. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मारियाच्या होणाऱ्या पतीला जबर धक्का बसला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने दोन आयोजक घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम राबवत त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी एकूण सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सुरक्षा नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा झाला का, याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Breakfast Avoid: सकाळच्या नाश्त्याला चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

भारतावरील मोठा अनर्थ टळला! दोन राज्यांमध्ये एटीएसची धाड, ८ दहशतवाद्यांना पकडले

पावसाळ्यात कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात? हे 5 ट्रेंडी पॅटर्न्स ठरतील परफेक्ट

Maharashtra News Live Update: पुण्यातील घोरपडी भागात एक मोठं झाड ७ ते ८ घरांवर कोसळलं

Monsoon Skin Care : पावसाळ्यातही सनस्क्रीन वापरतात का? लक्षात ठेवा या गोष्टी

SCROLL FOR NEXT