Uttar Pradesh News Saam tv
देश विदेश

Shocking : बाई, काय हा प्रकार... पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी तरुणाने देवीला घातलं साकडं; नवस पूर्ण होताच काय केलं? वाचा

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील एका तरुणाने पत्नीपासून सुटका व्हावी म्हणून देवाला नवस केला आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर ९ किमी लोटांगण घालत मंदिरात जाऊन नवस फेडला. या अनोख्या घटनेची सध्या चर्चा सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बायकोपासून सुटकेसाठी देवाला नवस

  • इच्छा पूर्ण झाल्यावर ९ किमी लोटांगण

  • अनोखा प्रकार गावात चर्चेचा विषय

  • सोशल मीडियावर व्हायरल स्टोरी पाऊस

असं म्हणतात की लग्नाची गाठ स्वर्गात बांधली जाते. तसेच अनेक महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, जन्मोजन्मी एकच नवरा मिळावा यासाठी वटपौर्णिमेला उपवास करून वडाची पूजा करतात. मात्र एका वैतागलेल्या व्यक्तीने चक्क बायको पासून सुटका मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना करत नवस केला. देवाकडे मागितलेली मागणी पूर्ण झाली म्हणून, त्याने आपल्या गावापासून ९ किलोमीटर लांब असलेल्या मंदिरात लोटांगण घालत नवस पूर्ण केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील सोनाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. सुरेश नावाच्या एका तरुणाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. या लग्नापासून सुरेश मानसिक तणावात होता. बायकोला वैतागून त्याने गावापासून ९ किलोमीटर लांब असलेल्या देवीच्या प्राचीन मंदिरात जाऊन आगळावेगळा नवस केला.

सुरेशने देवीकडे मागणी केली. "जर तू माझ्या बायकोपासून माझी सुटका केलीस तर मी लोटांगण घालत तुझ्या दर्शनाला येईन." काही दिवसांनंतर सुरेशची बायको त्याच्या पासून विभक्त झाल्याने त्याची इच्छा पूर्ण झाली.

देवीला केलेला नवस पूर्ण झाला म्हणून सुरेशने काहीही न खातापिता गावापासून ९ किलोमीटर लांब असलेल्या देवीच्या मंदिरात लोटांगण घालत प्रवास केला. यादरम्यान त्याच्या गुडघ्यांना दुखापत झाली, तरी पठ्ठया थांबला नाही. त्याने मंदिर गाठून देवीच्या चरणी नतमस्तक झाला. या आगळ्या वेगळ्या नवसाची गावभर चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT