Viral Saam
देश विदेश

Viral: भररस्त्यात टॉवेल गुंडाळून आली अन् आंघोळही केली; शेवटी सगळ्यांसमोर टॉवेल काढला अन् मग..VIDEO व्हायरल

Models Unconventional Roadside Bath: सध्या एका मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये मॉडेल टॉवेलवर भररस्त्यावर आंघोळ करत आहे.

Bhagyashree Kamble

प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण कधी काय करेल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मॉडेल चक्क टॉवेल गुंडाळून रस्त्यावर फिरत आहे. गडबडीने टॉवेलवर आंघोळही करत आहे. एवढंच काय तर, आंघोळ केल्यानंतर रस्त्यावरच तिने कपडे चेंज केले आहेत.

परिसरातील लोकांनी तिचा व्हिडिओ शूट केला आहे. तरूणी तयार झाल्यानंतर एका टॅक्सीतून निघूनही जाते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.

रस्त्यावरच टॉवेलवर आंघोळ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एका प्रसिद्ध मॉडेलचा आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिने एक नुकतंच व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तरूणाने टॉवेल गुंडाळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर ही तरूणी भर वर्दळीच्या ठिकाणी धावत जाते. नंतर केसांना शाम्पू लावून केस धुवायला सुरूवात करते. केस धुतल्यानंतर ती केस सुकवते आणि कंगव्याने केस विंचरून घेते.

ती रस्त्यावर उभी असलेल्या एका तरूणीला कानातले देते आणि तिला तिच्या कानात घालायला सांगते. त्या ठिकाणी एक चारचाकी रस्त्याच्या कडेला उभी असते. त्या चारचाकी वाहनाच्या खिडकीत पाहून मेकअप करून लूक कम्प्लिट करते. तयारी करत असताना तरूणीवर सगळे टकामका बघत असतात. तर, काही जण तिचा तयार होत असताना व्हिडिओ शूट करतात.

लूक कम्प्लिट झाल्यानंतर ती अंगावरील टॉवेल बाजूला काढते. टॉवेलच्या आत तिने मिनी ड्रेस घातलेला असतो. नंतर रस्त्याच्या कडेला एक टॅक्सी येते आणि तिला घेऊन जाते. सध्या या मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल होत असून काहींनी कमेंट करत तिचं कौतुक तर, काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT