Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News: दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा! तरुणांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, VIDEO पाहून अनेकांचा संताप

Viral Video: सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Viral Video: दिल्ली म्हटलं की पहिल्यांदा आठवत ते म्हणजे मेट्रो. सोशल मीडियावर एकदिवसा आड मेट्रोमधील अनेक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र परत एक दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काही तरुणा आणि एका प्रवाशांमध्ये काही कारणांवरुन तूफान राडा झालेला आहे. नक्की काय घडले हे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल.

नक्की घडलं तरी काय?

मेट्रोमधून अनेक प्रवाशी प्रवास (travel)करत होते. त्यात दोन तरुण आहे एका व्यक्तीमध्ये एका कारणावरुन वाद होतात. त्यानंतर त्यातील एक तरुण त्या व्यक्तीला बोलतो की तुला आई-बहिण आहे का? त्या दरम्यान त्यातला एका तरुणाने त्या व्यक्तीला खानाखाली मारतो इतकेच नाही तर दुसरा तरुणही त्या व्यक्तीला कानाखाली मारतो. त्यावर तो व्यक्ती तरुणाला विचारतो की मला तु कसे मारु शकतो?तर त्यावर तरुण बोलताना दिसून येत आहे की तू शिवी दिली म्हणून मी मारले. काही वेळानंतर मेट्रोमधील अन्य प्रवाशी यांचे वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व व्हिडिओ मेट्रोमधील(Delhi Metro) एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@tusharcrai'' का अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कोण चूक कोण बरोबर काय माहिती'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नेहमीच आहे हे'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT