IAS Avinash Sharan Saam TV
देश विदेश

IAS अधिकाऱ्याने ट्विटरवर सांगितला पहिला पगार; पोस्टवर नेटिझन्सच्या गमतीशीर कमेंट्सचा पाऊस

अवनीश शरण हे 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. UPSC परीक्षेत त्यांनी 77 वा रँक मिळवला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जिल्हाधिकारी (Collector) म्हटलं की त्यांचं मोठं ऑफिस, सिक्युरिटी, दरारा, शिस्त यामुळे त्यांना कामासाठी भेटायला जातानाही भीती वाटावी अशी सगळी परिस्थिती असते. मात्र सोशल मीडियामुळे ही परिस्थिती आता काहीशी बदलली आहे. अनेक सनदी अधिकारी आता सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव असून सर्वसामान्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात.

असेच एक छत्तीसगडचे आयएएस अधिकारी अवनीश शरण सोशल मीडियावर (Social Media) लोकांशी नेहमीच संवाद साधतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून आपल्या पहिल्या पगाराबद्दल सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ स्वतःबद्दलच सांगितले नाही तर लोकांनाही विचारले आहे.

आयएएस अधिकाऱ्यांच्या पगाराबाबत सर्वांना नेहमीच कुतूहल असतं. त्यामुळे या पोस्टवर अतिशय रंजक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अवनीश शरण हे 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. UPSC परीक्षेत त्यांनी 77 वा रँक मिळवला होता.

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, त्यांचा पहिला पगार 15,000 रुपये होता. त्यावेळी ते 27 वर्षांचे होते. हा पगार त्यांना ट्रेनी- IAS ऑफिरसर म्हणून मिळात होता.

आयएएस अवनीश शरण यांनी ट्विट केले आहे

आयएएस अवनीश शरण यांच्या या ट्विटनंतर लोकांकडून मजेशीर कमेंट येऊ लागल्या. काही लोक त्यांचा पहिला पगार सांगत आहेत तर काहीजण त्यांना त्यांच्या सध्याच्या पगाराबद्दल विचारत आहेत. अवनीश शरण देखील नेटिझन्सच्या कमेंट्सना तशीच मजेशीर उत्तरे देत आहेत. एका व्यक्तीने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, पहिला पगार 10 रुपये प्रति तास होता. वडिलांचे पाय दाबण्याचे काम होते.

दहावी, बारावीची मार्कशीटही शेअर केली होती

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी अलीकडेच त्यांची 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट शेअर केली आहे. त्यांना दहावीत 44.7 टक्के, बारावीत 65 टक्के आणि पदवीला 60 टक्के गुण मिळाले होते.

आयएएस अवनीश सांगतात की, राज्य लोकसेवा आयोगाच्या तयारीदरम्यान ते 10 पेक्षा जास्त वेळा प्रीलियम परीक्षेत नापास झाला होते. त्याचबरोबर यूपीएससीच्या तयारीत पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. UPSC CSE परीक्षेत त्यांनी 77 वा क्रमांक मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT