Viral Video Saam tv
देश विदेश

Viral Video: 'मुकाबला'वर जबरा लुंगी डान्स; पठ्ठ्याचा नाच पाहून व्हाल चकीत, नेटकरी म्हणाले, 'गरीबांचा प्रभूदेवा'

Viral Video: लुंगी परिधान केलेल्या या पठ्ठ्याचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Viral Video : भारतात कलाकारांची अजिबात कमतरता नाही. त्यात देशात डान्सरही खूप आहेत. शहरी-ग्रामीण भागातील डान्सर नानाविविध प्रकारच्या स्टाईलने त्यांची अदाकारी दाखवत असतात. काही लोकांना डान्स करणं इतक आवडतं की, कोणतंही गाणे लागल्यास नाचतच सुटतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लुंगी परिधान केलेल्या या पठ्ठ्याचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

दक्षिणेतील या पठ्ठ्याचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर @johndasyoutube या अंकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा व्हिडिओ दक्षिणेतील ग्रामीण भागातील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती नाचताना दिसून येत आहे. 'मुकाबला' गाण्यावरील डान्स पाहून अनेकांनी या पठ्ठ्याला 'गरीबांचा प्रभूदेवा' म्हणून संबोधले आहे.

लुंगी परिधान करत डान्स

'मुकाबला' या गाण्यावर पठ्ठ्याने अफलातून डान्स केला आहे. हा व्यक्ती सामान्य घरातील वाटत आहे. त्याने डान्सचे प्रशिक्षण देखील कुठे घेतले नसावे. तरी देखील या व्यक्तीने तुफान डान्स केला आहे. त्याच्या अफलातून स्टेप्स अनेकांना भावल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर 'गरीबांचा प्रभूदेवा' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओ होतोय व्हायरल

'गरीबांचा प्रभूदेवा'च्या डान्स व्हिडिओला २९ लाख जणांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रचंड प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, 'या पठ्ठ्याला गरीबांचा प्रभूदेवा म्हणणं चुकीचं ठरेल',

'या व्यक्तीकडे खूप कौशल्य आहे. गरीबांवर हसणं बंद केलं पाहिजे. सामान्य व्यक्तीही चांगल्याप्रकारे डान्स करू शकतो. त्यांचीही स्तुती केली पाहिजे', असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

Maharashtra News Live Update: सुनील शेळके यांच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना; अजितदादांच्या आठवणीने भावुक

BJP MLA Parag Shah : भाजप आमदार भिकाऱ्याच्या वेशात मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय, सोशल मीडियावर Video व्हायरल

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT