Japan Women Husband 520 Girlfriends Viral  Saam Tv
देश विदेश

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Japan Women Husband 520 Girlfriends : जपानमधील एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या ५०० अफेअर्सचा धक्कादायक खुलासा थेट कॉमिक बुकमधून केला आहे. वेदना, मातृत्व आणि आयुष्याशी झुंज देणारी ही कथा सध्या चर्चेत आहे.

Alisha Khedekar

  • जपानी महिलेने कॉमिकमधून नवऱ्याच्या ५२० अफेअर्सचा खुलासा

  • संशयातून धक्कादायक सत्य समोर आले

  • मुलाच्या आजारासाठी दीर्घकाळ गप्प राहिली

  • मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कॉमिक लिहलं

आजकाल तरुण मंडळी सर्रास डबल डेटिंग करताना पाहायला मिळतात. मात्र जपान मधील एका व्यक्तीचे ५२० अफेअर असल्याचं त्याच्याच पत्नीने उघडं केलं आहे. शिवाय संबंधित महिलेने आपली व्यथा एका कॉमिक बुकमध्ये मांडत तिने तिच्या नवऱ्याचे अफेअर असूनही कसा संसार थाटला या विषयी या पुस्तकात लिहिले आहे.

एका पेक्षा अधिक अफेअर असणे काय वाईट आहे? मात्र लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये हे अफेअर्स घातक ठरू शकतात. या अफेअर्समुळे जगातील अनेक संसार मोडकळीस आले आहेत. मात्र जपानी महिलेच्या एका कॉमिक मधील किस्स्याने लक्ष वेधून घेतले आहे. जपानी महिला कुसानो हीने या कॉमिकमध्ये म्हटले आहे की, तिचा नवरा दिवस दिवसभर कामात व्यस्त राहायचा. त्यामुळे ती सतत त्याच्यावर संशय घ्यायची.

एकेदिवशी तिच्या नवऱ्याच्या बॅगेत तिला कॉन्डमचे पॉकेट आणि व्हायग्रा सापडला. त्यामुळे तिचा संशय बळावला म्हणून तिने तिच्या नवऱ्याचा फोन तपासला असता तिच्या नवऱ्याची ५२० हुन अधिक अफेअर्स असल्याचे समजले. तरुण मुलींपासून ते अगदी वृद्ध महिलांसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे चॅटिंगद्वारे समजले. त्यानंतर समजले की, तिच्या नवऱ्याला शाळेत असल्यापासून लैंगिक आजार होता. हा आजार भयानक होता. या आजारामुळे तिच्या नवऱ्याला वेगवेगळ्या स्त्रियांसोबत शरीरसंबंध ठेवावे लागत असे.

मात्र या महिलेचा मुलगा एका दुर्मिळ आजाराने ग्रासलेला मुलाकडे वडिलांनी दुर्लक्ष करू नये म्हणून तिने कधीच तिच्या नवऱ्यापुढे तोंड उघडले नाही. तिने नवऱ्याच्या विरोधात सूड घेण्याचे ठरवले मात्र मुलाच्या आजारपुढे तिला पुन्हा गप्प बसावं लागलं. तिने योगा स्पेशालिस्टची मदत घेऊन या आजारावर निदान काढायचे ठरवले. आणि तिच्या पतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर उपचार देखील सुरु केले. कालांतराने दोघांनीही विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. कुसोने मुलाला एक हाती सांभाळले. मुलाला सांभाळत असताना तिने हे कॉमिक लिहिले आणि आपली व्यथा या कॉमिकमध्ये मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

SCROLL FOR NEXT