andhra pradesh highway accident video viral X social media
देश विदेश

Andhra Pradesh Accident Video : बाईकला वाचवताना भरधाव ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला, कारला धडकून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

andhra pradesh highway accident video viral : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात झाला. दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक दुसऱ्या मार्गिकेत घुसून ट्रकला धडकला. यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

Andhra Pradesh National Highway Accident : आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यात हा अपघात झाला. बरुआ जंक्शनजवळ अचानक रस्त्याच्या मधोमध आलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचवताना ड्रायव्हरनं ट्रक वळवला. तो थेट दुसऱ्या लेनमध्ये घुसला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारला धडकला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात ३ जानेवारीला ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रकसमोर अचानक दुचाकीस्वार आला. त्याला वाचवताना ड्रायव्हरने ट्रकचं स्टिअरिंग फिरवलं. त्यानंतर त्याचा स्टिअरिंगवरील ताबा सुटला. तो ट्रक थेट दुसऱ्या मार्गिकेत घुसला. समोरून कार भरधाव जात होती. त्या कारला हा ट्रक धडकला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मन विचलित करणाऱ्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधील अपघाताची दृश्ये मन विचलित करणारी....

या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील दृश्ये विचलित करणारी आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग चारपदरी असल्याचं दिसून येतं. बरुआ जंक्शनजवळ एक ट्रक भरधाव वेगात जात आहे. त्याच्याच पुढे काही अंतरावर एक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला उभा आहे. अचानक दुचाकीस्वार वळण घेतो. पण भरधाव येणारा ट्रक त्याला दिसला नाही. ट्रक ड्रायव्हरनं ते बघितलं आणि स्टिअरिंग वळवली. पण त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. तो ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला. त्याचवेळी त्या लेनवर समोरून कार येत होती. तो ट्रक जोरानं कारवर आदळला. त्यानंतरही ट्रक थांबला नाही. तो थेट महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत गेला.

रिपोर्टनुसार, या अपघातात एक जण जागीच मरण पावला. तर दोघांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्या दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर या महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांची गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यमुखी पडलेले तिघेही ओडिशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. तसेच अपघातग्रस्त ट्रकच्या ड्रायव्हरबाबत काहीही समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT