Pakistan Protest Saam Tv
देश विदेश

Pakistan: खोमेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसक आंदोलन, अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड; ९ जणांचा मृत्यू

Pakistan Protest: इराणचे सर्वोच्च नेते खोमेनेईंच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानमध्ये देखील उमटले. पाकिस्तानमध्ये संतप्त आंदोलकांनी अमेरिकेच्या दुतावासाची तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary:

  • खोमेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये तीव्र हिंसक आंदोलन

  • कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला

  • पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक होऊन ९ जणांचा मृत्यू झाला

  • अनेक आंदोलक आणि पोलिस कर्मचारी जखमी झालेत

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनेईंच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे. इस्राइल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्याच त्यांचा मृत्यू झाला. खोमेनेईंच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगभरामध्ये मुस्लिम समुदायाकडून आंदोलन केली जात आहे. भारतासह पाकिस्तानमध्ये अमेरिकेविरोधात आंदोलन केली जात आहेत. पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये आज हिंसाचार उसळला. हजारो आंदोलकांनी संतप्त अमेरिकेच्या वाणिज्य दुतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.

आंदोलकांनी अमेरिका दुतावासाची तोडफोड करत जाळपोळ केली. यावेळी जमावाने पोलिसांचे बॅरिगेट्स तोडल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबार आणि लाठीचार्ज देखील केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. यामध्ये अनेक आंदोलकांसह पोलिस देखील जखमी झाले. या हिंसाचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.

सिंध प्रांताचे गृहमंत्री झियाउल यांनी सांगितले की, कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. अमेरिका-इस्रायली संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर रविवारी एमटी खान रोडवर पोलिस आणि निदर्शकांमध्ये अमेरिकन वाणिज्य दूतावासाकडे कूच सुरू असताना संघर्ष झाला. ज्यामध्ये किमान ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, एमटी खान रोडवरील वाणिज्य दूतावासाबाहेर आंदोलक जमले आणि त्यांनी दुतावासामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी आंदोलक आणि पोलिस आमने सामने आले. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT