Karauli Violence Saam Tv
देश विदेश

करौलीत हिंसाचार आणि जाळपोळ; आतापर्यंत 46 जणांना अटक 'कर्फ्यू' वाढवला

राजस्थान येथील करौली येथे उसळलेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: राजस्थान येथील करौली येथे उसळलेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील परिस्थिती बघता प्रशासनाने परिसरात कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राजस्थान (Rajasthan) काँग्रेसने करौली हिसांचार घटनेच्या चौकशीसाठी ३ सदस्यीय शोध समितीची स्थापन करण्यात आहे. या समितीत आमदार (MLA) जितेंद्र सिंह आणि रफिक खान आणि करौली (Karauli) जिल्ह्याचे प्रभारी ललित यादव यांचा समावेश आहे. हे पॅनल करौली मधील घटनास्थळी भेट देऊन अहवाल राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करणार आहेत.

हे देखील पहा-

प्रशासनाने सांगितले आहे की, करौलीतील परिस्थिती सामान्य नाही, प्रशासन परिसरावर बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले आहे की, कायदा आणि सुव्यवस्थेनुसार सध्याची परिस्थिती सामान्य नाही. या पार्श्वभूमीवर कर्फ्यूचा ७ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करौली येथे बाईक रॅलीच्या दरम्यान दगडफेक आणि जाळपोळसह हिंसाचार झाल्याच्या घटनेनंतर २ एप्रिलपासून ४ एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

परंतु, अजूनही परिस्थिती सामान्य नसल्यामुळे कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. राजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले आहे की, सरकारी कार्यालये, न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी आणि परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्फ्यू शिथिल करण्याची परवानगी देण्यात आली. कर्फ्यूच्या काळात दूध, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पोलिसांच्या उपस्थितीत दिवसभरात २ तासांची सूट देण्यात येणार आहे.

करौलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर बुटोलिया यांनी सांगितले आहे की, हिंसाचारा संदर्भामध्ये अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोमवारी सकाळी कर्फ्यूमध्ये २ तासांसाठी शिथील करण्यात आले आहे. यादरम्यान कुठूनही अनुचित प्रकार घडला नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह आख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT