BJP internal survey Uttar Pradesh Assembly election Saam TV
देश विदेश

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यमान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

BJP internal survey Uttar Pradesh Assembly election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या अंतर्गत आकलनात १०० हून अधिक विद्यमान आमदारांविरोधात सत्ताविरोधी भावना असल्याचे वृत्त आहे.

Namdeo Kumbhar

UP Election : उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापासूनच जोरदार तयारी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी लाट (Anti-Incumbency) आणि आमदारांविषयीचा जनतेतील असंतोष कमी करण्यासाठी भाजप तब्बल १०० हून अधिक विद्यमान आमदारांची तिकीटे कापण्याच्या विचारात आहे. त्यांच्या जागी तरुणांना, महिलांना आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. (UP Election 2027: BJP May Drop 100+ Sitting MLAs)

उत्तर प्रदेशात सत्तेची 'हॅटट्रिक' साधण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. कोणताही धोका न पत्करता थेट निष्क्रिय आमदारांचे पत्ते कट करण्याची कडक भूमिका पक्षाने घेतली आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपने घेतलेल्या गुप्त सर्व्हेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपने तब्बल १०० विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरू केल्याची वृत्त स्थानिक माडियाने दिली आहे.

१०० आमदारांचा पत्ता का कट होणार?

भाजपने उत्तर प्रदेशात घेतलेल्या काही अंतर्गत सर्व्हेमध्ये अनेक आमदारांचे रिपोर्ट कार्ड आणि कामगिरी अत्यंत खराब आढळली आहे. त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये त्यांच्याविरुद्ध नाराजी असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपकडून अंतर्गत सर्व्हे घेण्यात आला होता. विद्यामान १०० आमदारांच्या जागी आता नव्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा धडा:

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला बसलेल्या फटक्यापासून पक्षाने धडा घेतला आहे. त्या वेळी अनेक जुन्या आणि निष्क्रिय चेहऱ्यांना पुन्हा संधी दिल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले होते, त्यामुळे आता ती चूक पुन्हा न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. फक्त 'जिताऊ' उमेदवारांनाच प्राधान्य: वरिष्ठ नेत्यांच्या आपापसातील गटबाजीला किंवा शिफारशींना थारा न देता, केवळ मतदारसंघात जिंकण्याची क्षमता असलेल्या आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल, असा ठाम निर्णय हायकमांडने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT