PM Modi  
देश विदेश

बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, काँग्रेसने किती जागा जिंकल्या? पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्षपणे डिवचले

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटकातील २८ विधान परिषद जागांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर पार पडल्या. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत काँग्रेसने किती जागा जिंकल्या, असा उपरोधिक सवाल केला.

Namdeo Kumbhar

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील २८ विधान परिषद (MLC) जागांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे (मतपत्रिका) पार पडल्या होत्या. यावरून आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

४ राज्यात २८ जांगावर शिक्षक पदवीधर मतदारसंघात निवडणूक पार पडली. भाजपला काही ठिकाणी विजय मिळला तर काही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. पण काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभवाचा जोरदार धक्का बसला. त्यावरूनच मोदींनी निशाना साधला.

काँग्रेस पक्षाकडून नेहमीच ईव्हीएमच्या (EVM) पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जातात आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली जाते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी एक्स (X) वर पोस्ट करत एक उपरोधिक सवाल विचारला आहे.

Narendra Modi latest X post

पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांमधील २८ विधान परिषद जागांसाठी निवडणुका पार पडल्या. विशेष म्हणजे या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. जरा अंदाज लावा पाहू, यात काँग्रेसने किती जागा जिंकल्या?"

राजकारण तापण्याची शक्यता

काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमविरोधात मोहीम राबवली जात असताना, बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकांच्या निकालांवरून पंतप्रधान मोदींनी साधलेला हा टोला अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या निकालानंतर आता भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा जोरदार राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मराठवाडा पदवीधरमध्ये विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जल्लोष; आता शिक्षक मतदारसंघाचे वेध

बदलापूरचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार! 240 कोटींच्या योजनेचं काम महिन्याभरात होणार सुरू

भाजपचा पराभव, ३० वर्षांचा बालेकिल्ला भुईसपाट! शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत सर्वात मोठा उलटफेर, कुणी मारली बाजी?

Best Foods To Eat And Avoid For Piles: मुळव्याध असेल तर काय खावे आणि काय टाळावे? जाणून घ्या

Chanakya Niti : तुमची ही ५ गुपितं इतरांना माहीतीयेत? मग चाणक्य नीतीचा हा सल्ला नक्की वाचा

SCROLL FOR NEXT