Airplane Viral Video Saam tv
देश विदेश

Viral Video : विमानाच्या पंखाला हवेतच तडा, 31000 फूट उंचीवर प्रवाशांचा जीव टांगणीला, पाहा VIDEO

प्रविण वाकचौरे

Viral Video :

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून बोस्टनला जाणाऱ्या विमानात एक विचित्र घटना घडली आहे. विमानाच्या पंखाच्या काही भागाला हवेतच तडे गेले. यानंतर बोस्टनला जाणारे विमान डेन्व्हरच्या दिशेने वळवावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

विमानाचे पंख अचानक तुटू लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हळूहळू पंखांना पडलेल्या भेगा आणखी वाढत होत्या. एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ते 31000 फूट उंचीवर उडत होते. याबाबत माहिती मिळताच प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र सुदैवाने नंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेची चौकशी करणार असल्याचं फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने सांगितलं आहे. युनायटेड एअरलाइन्सने देखील याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, विमानाच्या पंखात अडचण आल्यानंतर विमान सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना बोस्टनला नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली.

विमानच्या पंखाला तडा कशामुळे गेला हे अद्याप समजू शकलेले नाही. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बोइंग 757-200 या विमानात 165 प्रवाशी होते. सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT