Hyderabad Video
Hyderabad Video Saam TV
देश विदेश

Dog Attack On Boy : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

Hyderabad Dog Attack News: हैदराबादमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्याया भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलगा खेळत असताना कुत्रांनी हल्ला चढवला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून मुलाचे वडील धावत आले आणि त्यांनी त्याला कुत्र्यांपासून वाचवले आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू झालाय. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निजामाबादचा रहिवासी असलेले गंगाधर हैदराबादमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गंगाधर आपल्या मुलाला घेऊन काम करत असलेल्या ठिकाणी घेऊन आले होते. मुलगा खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने मुलावर हल्ला चढवला.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतं त्यानुसार, मुलगा धावत कुठेतरी जात असताना मागून तीन कुत्रे येऊन त्याच्यावर हल्ला करतात. एक कुत्रा हल्ला चढवतो, त्यावेळी मुलगा जमिनीवर पडतो. त्यानंतर दुसरे कुत्रेही त्याच्यावर हल्ला चढवतात. मात्र त्यातूनही मुलगा पुन्हा उठून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत पळतो. मात्र पुन्हा कुत्रे चिमुकल्यावर हल्ला चढवतात.

सीसीटीव्ही फूटेजमधील दृष्ये तुम्हाला विचलित करु शकतात. मुलाच्या रडण्याच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील धावत येतात आणि कुत्र्यांपासून त्याची सुटका करतात. तातडीने मुलाला ते रुग्णायात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यात मुलाचा मृत्यू झाला आहे.

देशभरात कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेशपासून ते महाराष्ट्र, गुजरातपर्यंत कुत्र्यांच्या दहशतीच्या बातम्या समोर येत आहेत.गुजरातच्या सुरत महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांत कुत्रा चावण्याच्या 477 प्रकरणांची नोंद झाली आहे. कुत्र्यांचा बळी ठरलेल्या लोकांमध्ये तीन वर्षांच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

SCROLL FOR NEXT