Rahul Gandhi News  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi News: राहुल गांधी अडचणीत; फौजदारी तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi Latest News: राहुल गांधी यांच्या विरोधात आणखी एक अब्रुनुकसानीची तक्रार दाखल झाली आहे

Vishal Gangurde

Rahul Gandhi latest News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात एक अब्रुनुकसानीची तक्रार दाखल झाल्याने त्यांना लोकसभाचं सदस्यत्व गमावावे लागले आहे. याचदरम्यान, आता राहुल गांधी यांच्या विरोधात आणखी एक अब्रुनुकसानीची तक्रार दाखल झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर हे राहुल गांधी यांच्याविरोधात कोर्टात पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या सावरकरांच्या वक्तव्याचे पडसाद सुरूच आहे. लंडनमधील त्याच वक्यव्यावरून सत्यकी सावरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. सत्यकी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इंग्लंडमध्ये राहुल गांधी यांनी अपमान केल्याचा आरोप आहे.

सावरकर यांच्या एका भावाचा नातू असलेल्या सत्यकी यांनी सांगितले की, 'राहुल गांधी गेल्या महिन्यात इंग्लंडला गेले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, सावरकर यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, त्यांना आपल्या ५ ते ६ मित्रांच्या मदतीने मुस्लीम व्यक्तीला मारहाण केल्याचा आनंद लुटला होता. मात्र, राहुल गांधींना पुस्तकाचा संदर्भ देत सांगितलेला किस्सा खोटा आहे. त्यांना काल्पनिक किस्सा सांगून सावरकरांचा अपमान केला आहे'.

'राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांकडून अनेकदा तथाकथित माफीनामा आणि पेन्शनबाबत ऐकलं आहे. पण प्रत्यक्षात ती क्षमा याचिका आणि निर्वाह भत्ता होता. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत, असे सत्यकी सावरकर म्हणाले.

दरम्यान, रणजित सावरकर यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, 'राहुल गांधी म्हटलं होते की,ते माफी मागणार नाही, कारण ते सावरक नाही. मी त्यांना आव्हान देतो की, गांधी यांनी सावरकरांनी माफी मागितलेले कागदपत्रे सादर करावीत. राजकारणासाठी देशभक्तांच्या नावाचा गैरवापर करणे चुकीचे आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे', असं सावरकर यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT