Vande Bharat Sleeper train update Saam TV
देश विदेश

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Vande Bharat Sleeper train update : दिल्ली-वाराणसी मार्गावर दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रस्तावित आहे. प्रयागराज आणि कानपूर थांबे, १६ डबे, ८२३ बर्थ, प्रस्तावित वेळापत्रक आणि वेगाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Delhi Varanasi Vande Bharat sleeper train proposed timetable : देशात आणखी एका नव्या 'वंदे भारत स्लीपर' (Vande Bharat Sleeper) ट्रेनला अधिकृत मंजुरी मिळाली आहे. ही अत्याधुनिक आणि अतिशय वेगवान स्लीपर ट्रेन वाराणसी आणि दिल्ली या प्रमुख शहरांना जोडणार आहे. या नव्या स्लीपर ट्रेनमुळे दोन मोठ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आलिशान होणार आहे.

आतापर्यंत चेअर कार (बसून प्रवास करणाऱ्या) वंदे भारत ट्रेनने देशभरात धुमाकूळ घातला होता. परंतु, लांब पल्ल्याच्या आणि रात्रं-दिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी अनुभव मिळावा, यासाठी रेल्वेने 'वंदे भारत स्लीपर' व्हर्जन आणले आहे. विमानासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक स्लीपर बर्थ, ऑटोमॅटिक दरवाजे आणि सुरक्षेसाठी 'कवच' प्रणालीने सज्ज असलेली ही वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार आहे.

वाराणसी आणि नवी दिल्ली दरम्यान ही हाय-स्पीड ट्रेन धावेल. ही ट्रेन कानपूर सेंट्रल आणि प्रयागराज येथेही थांबेल. यामुळे पूर्वांचल, मध्य उत्तर प्रदेश आणि कानपूर या औद्योगिक शहरातील प्रवाशांना दिल्ली ते वाराणसी दरम्यान प्रवासाचा एक नवीन पर्याय उपलब्ध होईल. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन वाराणसीहून रात्री ८:४० वाजता सुटेल, रात्री १०:०५ वाजता प्रयागराजला आणि सकाळी सुमारे ११:५० वाजता कानपूर सेंट्रलला पोहोचेल. त्यानंतर ही ट्रेन पहाटे सुमारे ४:५० वाजता नवी दिल्लीत पोहोचेल. वाराणसी ते दिल्ली या प्रवासाला अंदाजे ८ तास १० मिनिटे लागण्याची शक्यता आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन नवी दिल्लीहून रात्री ११:२५ वाजता सुटेल. ती कानपूरला पहाटे ३:३० च्या सुमारास आणि प्रयागराजला पहाटे ५:३८ वाजता पोहोचेल. त्यानंतर ट्रेन सकाळी ७:३५ च्या सुमारास वाराणसीला पोहोचण्याची शक्यता आहे. रेल्वेने अद्याप या वेळापत्रकावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेले नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम वेळापत्रक, तिकिट आणि संचालनाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे आणि अंदाजे ८२३ बर्थ असतील. यामध्ये ११ थर्ड-एसी डबे, चार सेकंड-एसी डबे आणि एक फर्स्ट-एसी डब्याचा समावेश असेल. सुरुवातीला, ट्रेनचा कमाल वेग ताशी १३० किलोमीटर असेल असे सांगण्यात येत आहे. नंतर हा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे. ट्रेनचा रॅक चाचण्यांसाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT