Class 11Th Student Saam Tv
देश विदेश

Shocking News: "लव्ह यू आई, माझ्या भावाची काळजी घे गं.."सुसाईड नोट लिहून ११ वीत शिकणाऱ्या तरूणीनं घेतला गळफास; कारण फक्त इतकंच..

16-Year-Old Girl Ends Life Over Parental Dispute: एका १६ वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी तरूणीचे तिच्या आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. याच कारणामुळे तिने आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

गुजरातमधील वडोदरामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका १६ वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी तरूणीचे तिच्या आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. तरूणी नेहमी तिच्या मित्राला गाडीवरून घरी सोडायची. आईने फक्त लिफ्ट देण्यावरून तरूणीला फटकारले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून तरूणीने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. घरातच तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मृत तरूणी ११ वीची विद्यार्थिनी होती. २ दिवसांपूर्वी तिच्या आईने तिला फटकारले होते. "मित्राला रोज गाडीवरून का सोडतेस आणि आणतेस?" याच कारणावरून आईने तरूणीला फटकारले होते. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर, तिसऱ्या दिवशी मृत तरूणीची आई काही कामासाठी शेजारच्या घरी गेली होती. त्यावेळी तरूणीचा धाकटा भाऊ घरी होता.

आई शेजारच्या घरी गेलेली पाहताच तरूणीने रागाच्या भरात स्वत:ला संपवण्याचे ठरवले. तिने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई घरी परतली तेव्हा मुलीला फासावर लटकलेलं पाहून तिला धक्काच बसला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

यानंतर पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईट नोटही सापडली. ही सुसाईड नोट तिने तिच्या आईसाठी लिहिलेली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुसाईड नोटमध्ये, "सॉरी आई, मी तुझ्या धाकात नाही राहू शकत. प्रत्येकाने आनंदित जगा. मी जात आहे. माझ्या धाकट्या भावाची काळजी घ्या. लव्ह यू आई". पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT