Uttarakhand News tunnel collapse in uttarkashi Saam TV
देश विदेश

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील खोदकाम थांबवलं, सध्या घटनास्थळी परिस्थिती काय?

Vishal Gangurde

Uttarkashi Tunnel News:

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना गेल्या ११ दिवसांपासून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या ४१ मजुरांना बाहेर काढण्याच्या कामाकडे साऱ्या भारतीयांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बचावपथकाकडून बोगद्याला खोदकाम(ड्रिलिंग) सुरु होतं. मात्र, आज शुक्रवारी बोगद्याला खोदकाम करण्याचं काम थांबविण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

बुधवारी रात्री ऑगर मशीनच्या मदतीने लोखंडी गर्डर कापण्याचं काम सुरु होतं. मात्र, गेल्या काही तासांत ऑगर मशीनने खोदकाम करताना अडथळा निर्माण झाल्याने काम थांबवण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिसऱ्यांदा थांबवलं खोदकाम

उत्तराखंड येथील चार धाम मार्गावरील निर्माणाधीन बोगद्याचा एक भाग कोसळला. १२ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. या बोगद्यात अडकलेल्या मजुरांना काढण्याचं काम बचावपथकाडून सुरु आहे. या बोगद्याच्या आतापर्यंत तिसऱ्यांदा खोदकाम थांबवण्यात आलं आहे.

PM मोदी यांनी साधला छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी फोनवर संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून उत्तराकाशीमधील निर्माणाधीन बोगद्यातील रेस्क्यू ऑपरेशनविषयी माहिती जाणून घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना निर्देश दिले की, मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना गरज लागल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करा. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी योग्य व्यवस्था करा'.

तसेच त्यांनी बचावकार्याच्या प्रगतीविषयी माहिती जाणून घेतली. काही मदतीची गरज असल्यास त्याबाबत कळवण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT