Uttarakhand Accident News ANI
देश विदेश

Uttarakhand Accident : भीषण! भरधाव बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

Uttarakhand Accident News : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव बस दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

Vishal Gangurde

Uttarakhand bus accident : उत्तराखंडमध्ये अपघाताची भीषण घटना घडली आहे. उत्तराखंडच्या पौडी शहरातील केंद्रीय विद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबल उडाली.

भरधाव बसवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही बस १०० मीटर खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातानंतर एकच खळबळ उडाली. अपघातामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघाताने प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये मिनी बसचा अपघात झाला आहे. ही बस श्रीनगरसाठी रवाना झाली होती. त्यानंतर पौडी पौडीच्या कोठार बेंडजवळ ४ वाजता अपघाताची भीषण दुर्घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये २० प्रवासी होते. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींना तत्काळ प्राथमिक उपचारसाठी पौडी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातामधील गंभीर जखमींना श्रीनगर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे.

या घटनेविषयी माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. आशीष चौहान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य जलदगतीने मदत करण्यास सांगितलं. जिल्हाधिकारी चौहान यांनी अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाला निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी पीडितांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रशासनाकडून तातडीने जखमी मदत केली. या अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT