गायक जुबिन नौटियाल यांचे वडील राम शरण नौटियाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी शैलजा यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
ऐन दसऱ्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे निष्ठावंत नेत्यानं काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. देहराडून जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि गायक जुबिन नौटियाल यांचे वडील रराम शरण नौटियाल यांनी सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क लावले जात होते; मात्र आता काँग्रेस पक्षात सामील होण्याच्या निर्णय घेतला.
सोमवारी एआयसीसी (AICC) च्या राष्ट्रीय सचिव कुमारी शैलजा, उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल आणि विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांच्या उपस्थितीत रामशरण नौटियाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रामशरण नौटियाल यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातूनच केली होती. याआधी त्यांनी उत्तराखंड काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते.
रामशरण नौटियाल हे २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले होते. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना चकराता मतदारसंघातून उमेदवारी दिली होती; मात्र, ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जातं. आता त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं भाजपचा मोठा नुकसान होणार आहे.
काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर रामशरण नौटियाल म्हणाले, "पक्ष माझ्याबद्दल काय विचार करतो, हे मी सांगू शकत नाही. मी स्वतःहून या पक्षात सामील होण्याचा आणि काँग्रेससाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही आश्वासनांची मागणी केलेली नाही; उलट, मी स्वतःला पूर्ण निष्ठेने पक्षाच्या कामासाठी समर्पित केले आहे."
रामशरण नौटियाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर कुमारी शैलजा यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी असे नमूद केले की, ज्यांची मने शुद्ध आहेत, त्यांना सध्याची परिस्थिती पाहून वेदना होतात. नौटियाल यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून काम केलंय. काही कारणांमुळे त्यांनी पक्ष सोडला होता, परंतु पक्षाची सध्याची कार्यपद्धती पाहून त्यांनी पुन्हा पक्षात परतण्याचा निर्णय घेतला.
कुमारी शैलजा यांनी सांगितलं की, त्यांनी अनिच्छेने भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता राहुल गांधींपासून प्रेरित होऊन त्या काँग्रेसमध्ये सामील होत आहेत. भाजपमध्ये त्यांना कोंडल्यासारखे वाटत होते आणि तिथले वातावरण तसेच कामाचे स्वरूप पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला होता. उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी सांगितले की, आज एक महत्त्वाचे सहकारी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांचा प्रभाव केवळ देहरादूनपुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर पसरलेला आहे. त्यांच्या येण्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.