Haridwar Saam Tv
देश विदेश

Haridwar News: हरिद्वारमधील त्या मुलाचा मृत्यू बुडून झालाच नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, VIDEO झाला होता व्हायरल

Uttarakhand News: बुधवारी हरिद्वारमघ्ये एक धक्कदायक घटना घडली होती. ५ वर्षीय कॅन्सर पीडित चिमुकल्याचा गंगास्नान करताना मृत्यू झाला होता. याप्रकरणी शवविच्छेदन रिपोर्टमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Haridwar Cancer Patient 5 Year Old Boy Died News Update:

बुधवारी हरिद्वारमघ्ये एक धक्कदायक घटना घडली होती. ५ वर्षीय कॅन्सर पीडित चिमुकल्याचा गंगास्नान करताना मृत्यू झाला होता. यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. या रिपोर्टमध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे. यात मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून नव्हे तर त्याआधीच झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला ब्लड कॅन्सर आणि हाडांचा कॅन्सर होता. त्याची तब्येत खूप खालावली होती. त्याच्यावर रुग्णालयाचत उपाचर सुरु होता. तेथे मुलाची प्रकृती खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला गंगेत स्नान करण्यासाठी नेले होते. गंगेत स्नान केल्याने मुलगा आजारातून बरा होईल, असा त्याच्या कुटुंबियांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी मुलाला गंगेत बुडवून स्नान केले. याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलाला मृत घोषित करण्यात आले.

मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या रिपोर्टमध्ये मुलाचा मृत्यू अॅनिमिया या आजारामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून नाही तर त्याआधीच झाला होता. मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या अंगात पाणी नव्हते. त्यावरुन त्याचा मृत्यू आधीच झाल्याचे समोर आले आहे. मुलाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात केले हजर

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT