Uttarakhand Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News: ज्याच्याशी होणार होतं लग्न त्यानेच केला घात; तरुणीला हॉटेलात बोलावलं अन्...

Uttarakhand Crime News: ज्या तरुणीच्या कुटुंबियांसोबत तरुणाच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्याच तरुणीला हॉटेलात बोलावून तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Uttarakhand Crime News: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या तरुणीच्या कुटुंबियांसोबत तरुणाच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्याच तरुणीला हॉटेलात बोलावून तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर, त्याने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवताना व्हिडीओ देखील बनवले.

ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अखेर वेदना असह्य झाल्याने पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना सांगितली. मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकरली. (Latest Marathi News)

त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर तरुण फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित तरुणीने पोलिसांत (Police) दिलेल्या तक्रारीनुसार, ती तिच्या मामाच्या घरी राहते आणि एका कंपनीत काम करते. मामाच्या शेजारी भाड्याने राहणारा पुनीत शर्मा हाही त्याच परिसरातील एका कंपनीत काम करतो. तो मूळचा उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी आहे.

काही दिवसांपूर्वी पुनीतचे कुटुंब पीडितेच्या आई-वडिलांकडे गेले. त्यांनी पुनित आणि पीडित तरुणीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. घरी दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू असतानाच पुनितने पीडित तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावले.  (Breaking Marathi News)

तरुणीने हॉटेलात येण्यास नकार दिला. तेव्हा त्याने आपल्या बहिणीसोबत तुझी भेट करून द्यायची आहे, ती हॉटेलमध्ये थांबली आहे, असा बहाणा करत तरुणीला हॉटेलात बोलावलं. तरुणी हॉटेलमध्ये येताच त्याने तिला कोल्ड्रिक्समधून नशेच्या गोळ्या दिला.

दरम्यान, तरुणी बेशुद्ध असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने शरीरसंबंध ठेवताना व्हिडीओ (Crime News) देखील बनवले. पीडितेने सांगितले की, आरोपीने फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला.

भीतीमुळे ती हे कोणालाही सांगू शकत नव्हती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, जेव्हा आरोपीने तिला ब्लॅकमेल करून पैसे आणि दागिने मागितले तेव्हा तिने तिच्या कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून पुनीतविरोधात तक्रार दिली.

दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पुनीत फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून या प्रकरणाचा तपास महिला उपनिरीक्षक रश्मी रावत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT