Uttarkhand Breaking News Saam Digital
देश विदेश

Uttarakhand Breaking News: उत्तराखंडमध्ये भूस्खलन, ४० कामगार अडकले

Uttarakhand Breaking News: उत्तराखंडमधील उत्तरकाशीत ऐसा बोगद्यात ४० कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यमनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गाचं काम सुरू असून या अंतर्गत सिरक्यारा ते डंडालगावापर्यंत बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttarakhand Breaking News

उत्तराखंडमधील उत्तरकाशीत ऐसा बोगद्यात ४० कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यमनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गाचं काम सुरू असून या अंतर्गत सिरक्यारा ते डंडालगावापर्यंत बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी चारच्या सुमारास साडेचार किमी लांब बोगद्याचा जवळपास १५० मीटर भाग कोसळला आहे. घटनेच्या माहितीनंतर उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचावकार्य हाती घेतलं. घटनास्थळी पोलीस, राज्य आपत्ती व्यवस्थापण, अग्निशमनदल यांच्यासह महामार्गाचे काम करणारे कर्मचाऱ्यांकडून मदत कार्य सुरू आहे. सिरक्यारा ते डंडालगावापर्यंत सुरू असलेल्या या बोगद्यामुळे उत्तरकाशी ते यमनोत्री धामपर्यंत २६ किमीचं अंतर कमी होणार आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत ऑक्सिजन पाईप पोहोचवण्याच आली असून सर्व कामगार सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आलवेदर रोड प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या या बोगद्याची लांबी ४.५ किमी आहे. यातील जवळपास ४ किमीचे काम पूर्ण झाले असून सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच उद्दीष्ट होतं. मात्र आता मार्च २०२४ पर्यंत याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. बोगद्याच काम एनएचआयडीसीएलच्या अंतर्गत नवयुगा कंपनीकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: प्रथमेश परब आणि शशांक शेंडेचा 'श्री गणेशा' लवकरच; चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra News Live Updates: छत्तीसगडमध्ये चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

Escalator In Marathi: एस्कलेटरला मराठीत काय म्हणतात?

Shocking Video: पर्यटकांच्या बसमध्ये जाण्यासाठी बिबट्याची खिडकीवर झेप, पुढे काय झालं ते पाहाच

SCROLL FOR NEXT