HALDWANI ACCIDENT: FOUR FRIENDS KILLED AFTER SPEEDING SCORPIO HITS BIKE ON FLYOVER IN UTTARAKHAND Saam Tv
देश विदेश

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Uttarakhand Bike Accident Update News : उत्तराखंडमध्ये भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने चार मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीनपानी-गौलापार बायपास फ्लायओव्हरवरील या भीषण अपघातानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • हल्द्वानीतील तीनपानी-गौलापार बायपास फ्लायओव्हरवर भीषण अपघात

  • भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीवरील चार मित्रांना जोरदार धडक दिली

  • या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

  • पोलीस पुढील तपास करत आहेत

उत्तराखंडमधील हल्द्वानीमध्ये शनिवारी रात्री भीषण अपघातात घडला. या अपघातात चार मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीनपानी-गौलापार बायपास फ्लायओव्हरवर भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कॉर्पिओ कारने दुचाकीवरून जाणाऱ्या चार मित्रांना जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चारही मित्र एकत्र भेटण्याचा प्लॅन ठरला होता. ठरल्यानुसार चौघेही भेटले आणि दुचाकीवरून जात असतानाच काळाने घाला घातला. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तीनपानी-गौलापार बायपास फ्लायओव्हरवर भरधाव वेगाने धावणाऱ्या स्कॉर्पिओ कारने दुचाकीवरून येणाऱ्या ४ मित्रांना जोरदार धडक दिली. या धडकेत चौघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. फ्लायओव्हरवर अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना राहुल राजपूत (१७), शिवम (२५), अंशु आर्य (२०) आणि आदित्य टम्टा (१८) हे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांच्या जवळच एक दुचाकी पडलेली होती.

चारही जखमींना तातडीने डॉ. सुशीला तिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र राहुल, शिवम आणि अंशु यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या आदित्यचा मध्यरात्रीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे चारही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचे चाकही कारपासून वेगळे झाले. पोलिसांनी स्कॉर्पिओमधील दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, चारही मित्र घरातून एकमेकांना भेटण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र ही त्यांची शेवटची भेट ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवमने घरातून निघताना आईला "एका तासात परत येतो" असे सांगितले होते. मात्र काही वेळातच त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Pune : पुणेकरांची चिंता मिटली! धरणातील पाणी पातळीत वाढ; शहरात तूर्तास पाणीकपात नाही

घड्याळाच्या जाहिरातीत नेहमी 10:10 हीच वेळ का दिसते?

Police Officer Transfer: मोठी बातमी! ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडक्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Tourism : पावसाळ्यात सुंदर दिसणारे पण धोकादायक आहेत 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स, जाण्याआधी १०० वेळा विचार करा

SCROLL FOR NEXT