धक्कादायक! उत्तराखंडमध्ये अपघातात दोन दिवसात 10 जणांचा मृत्यू Twitter
देश विदेश

धक्कादायक! उत्तराखंडमध्ये अपघातात दोन दिवसात 10 जणांचा मृत्यू

शामाजवळील फरसाळी येथील बेटोप नाल्यात दोन पर्यटक वाहनांच्या चालकांचा तोल गेला.

वृत्तसंस्था

शामाजवळील फरसाळी येथील बेटोप नाल्यात दोन पर्यटक वाहनांच्या चालकांचा तोल गेला. या अपघातात पाच बंगाली पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 15 पर्यटक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि महसूल पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. जखमींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

याबाबत कापकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हल क्रमांक UK 04 TA 1755 हा शामा-तेजम मोटार वेवरील बेटोप नाल्याजवळ मुनसियारीहून कौसानीकडे येत होता. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यावर उलटली. त्याच्या पाठीमागून येणारे दुसरे ट्रॅव्हल्स वाहन क्रमांक UK 04 TA 1376 अचानक समोरून येणाऱ्या वाहनाच्या पलटी होऊन खड्यात जाऊन पडली. ज्यामध्ये गाडीतील पर्यटकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

या आपत्तीत पर्यटकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी हिमस्खलनात पाच बंगाली पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये एका आठवड्यानंतर मोठ्या कष्टाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघाताची बातमी येऊन एक दिवसही गेला नाही. त्यात दुसरी बातमी आली पाच बंगाली पर्यटकांचा मृत्यू झाला. आणि अनेकजण जखमी झाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT