Wedding bus accident  Saam TV Marathi
देश विदेश

५० वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भयंकर अपघात, आधी कंटेनर मग ट्रकने मारली धडक, आरडाओरड अन् किंकाळ्याने परिसर हादरला

Wedding bus accident : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे ५० वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या बसला आधी कंटेनर आणि नंतर ट्रकने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात १२ ते १५ जण जखमी झाले असून पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Wedding bus accident in Uttar Pradesh Firozabad : लग्नातील वऱ्हांड्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये भयंकर अपघात झाला. शुक्रवारी रात्री फिरोजाबादच्या शिकोहाबाद येथे राष्ट्रीय महामार्गावरील रामलीला मैदानाजवळ झालेल्या अपघातानंतर आरडाओरड अन् किंकाळ्याने परिसर हादरा होता. शुक्रवारी रात्री महामार्गावर ५० वऱ्हांड्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आधी कंटेनरने जोरात धडक दिली. त्यानंतर ट्रकही येऊन धडकला. एकाच बसला दोन वाहनांनी दिलेल्या धडकेनंतर महामार्गावर एकच गोंधळ उडाला. काही काळासाठी महामार्ग ठप्प झाला होता.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. १२ ते १५ जण जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक मीडियाने दिले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चूक कुणाची होती? याचा तपास सुरू केला आहे.

फिरोजाबादमधील काफिलचा यांच्या लग्नासाठी बसने वऱ्हाडी इटावाला निघाले होते. या बसमध्ये ५० पेक्षा जास्त वऱ्हाडीमंडळी होते. ही बस शिकोहाबादमधील रामलीला मैदानाजवळ आल्यानंतर अचानक समोरून एक कार आली. या कारला वाचवण्याच्या नादात बस चालकाने वेगात ब्रेक लावला. त्यामुळे पाठीमागे असणाऱ्या कंटेनरने बसला जोरात धडक दिली. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली.

कारला वाचवण्याच्या नादत बस चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागे असणारा कंटेनर नियंत्रणाबाहेर गेला अन् बसला धडकला अन् आडवा झाला. पण त्याचवेळी कंटेनरच्या मागे असणाऱ्या ट्रकनेही जोरात बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कंटेनर डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनवर गेला. ३ वाहनांच्या धडकेनंतर महामार्गावर वाहतूककोंडी झालीच. पण अपघातग्रस्त बसमधील वऱ्हांडीमंडळी प्रचंड घाबरले. आरडाओरड अन् किंचाळ्याने बसमधील वातावरण अधिकच भीतीदायक झाले.

वऱ्हाडाच्या बसमध्ये असणारे १२ ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सर्व जखमींना पोलिसांनी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे, भीषण अपघातानंतर बस, कंटेनर आणि ट्रक चालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांकडून तिघांचा शोध घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Elections 2026 voting Live update : कोल्हापूर ग्रामीण भागात मतदानासाठी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी

Maharashtra Live News Update: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होईल, रोहित पवार नेमकं काय म्हणाले ?

Crime News : 'माझी ईच्छा पूर्ण कर' नोकरीच्या बदल्यात नको ते मागितलं, माजी सैनिकाच्या मुलीसोबत भयंकर घडलं!

Police Bharti: तयारीला लागा! पोलिस भरतीची तारीख ठरली; या दिवशी होणार मैदानी चाचणी

T20 World Cup : सूर्यादादाकडे विश्वविक्रमाची संधी, आज विश्वचषकाची सुरूवात, कुठे अन् कधी पाहाल सामना?

SCROLL FOR NEXT