uttar pradesh ips Saam tv
देश विदेश

IPS Transfer : पोलीस प्रशासनात बदल्यांचा धडाका सुरूच; 27 IPS अधिकाऱ्यांची बदली, कुणाची कुठे नियुक्ती?

IPS Transfer in Uttar pradesh : उत्तर प्रदेशातील पोलीस प्रशासनात बदल्यांचा धडाका सुरूच आहे. 27 IPS अधिकाऱ्यांची आज सोमवारी बदली करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशात बदल्यांचा धडाका

27 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

दोन दिवसांपूर्वीच काही अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. यंदा थेट 27 IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यात १३ जिल्ह्यातील SP-SSP अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. शाहजहांपूर, एटा, महोबा, रामपूर, कौशांबी, चंदौली, अमरोहा, मऊ, जलौन, बहराइच, फिरोजाबाद, महाराजगंज आणि हमीरपूर या जिल्ह्याचा समावेश आहे. चंद्र प्रकाश यांची पोलीस निरीक्षक (सुरक्षा) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठा उलटफेर करण्यात आला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण २७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लखनौ आणि नोएडाच्या पोलीस आयुक्तपदावरून इतर जिल्ह्याच्या उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लखनौचे पोलीस उपआयुक्त शंशाक सिंह यांची महोबाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लखनौ उपायुक्तातील विश्वजीत श्रीवास्त यांची बहराइचच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस अक्षीक्षक रामनयन सिंह यांची नोएडा येथे बदली करण्यात आली आहे.

फिरोजाबादचे पोलीस अधीक्षक सौरभ दीक्षित यांची शहाजहानपूरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मऊचे पोलीस अधीक्षक एलमारन जी यांची एटाच्या सहायक पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्याम नारायण सिंग याची एसडीआरएफमध्ये बदली करण्यात आली आहे. महाराजगंजचे पोलीस अक्षीक्षक सोमेंद्र मीना यांची रामपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चंदौलीचे पोलीस अधीक्षक आदित्य लांघे यांची फिरोजाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कमलेश बहादूर यांची मऊच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एसपी अमित कुमार आनंद यांची लखनौ आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. एटीएसचे एसपी विनय कुमार सिंग यांची जालौनच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दुर्गेश कुमार यांची अयोध्याच्या ६ व्या एसएसएफ बटालियनच्या कमांडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खान्देशसाठी आनंदाची बातमी! विनाब्रेक धावणार दादर-भुसावळ एक्स्प्रेस; तिकीट दरातही दिलासा

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात मजुराने धावत येऊन ट्रकच्या चाकाखाली केली आत्महत्या; घटना CCTV मध्ये कैद

Ashok Kharat: खरात प्रकरणाचे लोण आता उपसभापतींच्या दारात? भविष्य जाणून घेण्यासाठी नीलम गोऱ्हे गेल्या भेटीला?

भोंदू खरात IPS, IAS अधिकाऱ्यांना बायकांची अदलाबदल करायला लावायचा; माजी मंत्र्यांच्या आरोपांनी खळबळ | Special Report

Blouse Designs: साध्या साडीलाही देतील मॉडर्न लूक, ब्लाऊजचे 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT