Uttar Pradesh, Sitapur Saam Tv
देश विदेश

UP News: पतीसोबत झालं भांडण, महिलेने उचललं टोकाचं पाऊल; 3 मुलांसह विष प्राशन करून संपवलं जीवन

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. इथे पतीसोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने आपल्या तीन मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन केलं.

Satish Kengar

Uttar Pradesh Crime News:

उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. इथे पतीसोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने आपल्या तीन मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन केलं. यामुळे चौघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानपूर परिसरातील अहमदपूर गावात ही घटना घडली. जिथे बुधवारी ३२ वर्षीय राजकुमारीचा पतीसोबत काही कारणावरून वाद झाला. याचा राग येऊन तिने आपल्या तीन निरागस मुलांना विष पाजून स्वतःही प्राशन केले. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे तीन मुलांसह महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  (Latest Marathi News)

या प्रकरणी स्थानिक पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, राजकुमारी यांचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात तिने हे भयानक पाऊल उचलले. सध्या मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, नेमकं महिला आणि तिच्यात पतित कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता, हे अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत पोलिसांनाही अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. महिलेच्या पाटील ताब्यात घेऊन पोलीस नेमकं काय घडलं होतं, याबाबत चौकशी करत आहेत. तसेच ही आत्महत्या होती की, घातपात, याबाबतही पोलीस सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT