Dumper Crushes Car, 7 Dead on the Spot Saam
देश विदेश

नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाताना काळाचा घाला, भरधाव डंपर कारवर उलटला; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

Dumper Crushes Car, 7 Dead on the Spot: उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गागलहेडी परिसरात डंपर आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गागलहेडी परिसरातून एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी चारचाकी आणि डंपरचा भीषण अपघात घडला. भरधाव आणि अनियंत्रित डंपर चारचाकीवर उलटली. यामुळे कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद माजरा येथील रहिवासी महेंद्र सैनी यांच्या मेहुण्याचे गुरूवारी निधन झाले होते. शुक्रवारी सकाळी महेंद्र सैनी हे त्याच्या कुटुंब आणि नातेवाईकांसह अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी जात होते. कारमध्ये महेंद्र, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, जावई आणि मेहुणीचा मुलगा होता. तसेच आणखी एक नातेवाईक त्यांच्यासोबत होता.

अचानक एका वेगाने येणाऱ्या डंपरचे नियंत्रण सुटले. डंपर थेट कारवर उलटली. क्षणात कार पूर्णपणे चिरडली. कारच्या आत असलेले लोक पूर्णपणे चिरडले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला. त्याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, एकाच कुटुंबातीला सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT