Two senior BJP leaders may quit the party ahead of elections in Uttar Pradesh saam tv
देश विदेश

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

UP Politics : उत्तर प्रदेशच्या राजकारणात निवडणुकीआधी मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामलीमधील भाजपचे काही बडे नेते समाजवादी पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरूय.

Bharat Jadhav

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे.

  • भाजपमधील दोन बडे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत

  • सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली या तीन जिल्ह्यांमध्ये पक्षांतराच्या चर्चांना वेग

उत्तर प्रदेशात राजकीय हालचालींना वेग आलाय. उमेदवारीवरून नेते मंडळी आप-आपल्या परीने फिल्डिंग करत आहे.परंतु ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही ते थेट पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलीय. कारण भाजपमधील दोन बडे नेत्यांनी बंडाचं हत्यार उगारलंय.

पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांमध्ये राजकीय पक्षांतराची चर्चा सुरूय. अनेक बडे नेते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत, ते लवकरच पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. मात्र, निवडणुकीत उमेदवारी (तिकीट) देण्याच्या आश्वासनांवरून निर्माण झालेले प्रश्न आणि त्यामुळे पक्षातील निष्ठावान व जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, यामुळे या संभाव्य पक्षप्रवेशांच्या प्रक्रियेत विलंब होत आहे.

साहब सिंग सैनी (माजी कॅबिनेट मंत्री):

अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात मंत्री आणि विधान परिषद सदस्य (MLC) राहिलेले साहब सिंग सैनी २०२३ मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते. आता ते पुन्हा समाजवादी पक्षात परत येऊ शकतात, अशी चर्चा सुरूय. सैनी समाजात त्यांचा प्रभाव असल्याने समाजवादी पक्षाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी याआधी भाजपमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यावरून पक्षातील काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत.

मजिद अली (बसपा नेते):

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहारनपूरमधून बसपाचे उमेदवार मजिद अली देखील आपला पक्ष बदलणार असल्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी देवबंदचे माजी आमदार मविया अली यांच्यासोबत अखिलेश यादव यांची भेट घेतली. ते लवकरच आपल्या समर्थकांशी चर्चा करून कोणताही निर्णय घेऊ शकतात.

चौधरी नीरपाल (आरएलडी नेते):

आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळलेले चौधरी नीरपाल हे आरएलडीच्या क्रीडा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २०१२ ते २०१७ या काळात समाजवादी पक्षाशी (एसपी) संबंधित असलेले हे जाट नेते पुन्हा पक्षात परतल्यामुळे, पश्चिम उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला मोठा राजकीय फायदा होऊ शकतो. देवबंद आणि नकुर विधानसभा मतदारसंघांतील सहारनपूरमधील दोन महत्त्वाच्या जागांच्या उमेदवारीबाबतची परिस्थिती अजूनही गुंतागुंतीचीच आहे.

देवबंद: माविया अली विरुद्ध माजिद अली – माविया अली यांनी समाजवादी पक्षात (SP) नवीन नेत्यांना आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. ज्यामुळे त्यांचे स्थान अधिक बळकट झाले आहे. दुसरीकडे, बहुजन समाज पक्षातून (BSP) समाजवादी पक्षात आलेले माजिद अली यांनीही या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय.

नकुर: डॉ. धर्म सिंग सैनी विरुद्ध साहिल खान –

२०२२ मध्ये भाजप सोडून समाजवादी पक्षात (SP) सामील झालेल्या डॉ. धर्म सिंग सैनी यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यावर, नाराज होऊन साहिल खान यांनी बहुजन समाज पक्षात (BSP) प्रवेश केला होता. आता, साहिल खान पुन्हा एकदा नकुर मतदारसंघात लोकांमध्ये सक्रिय झाले असून, समाजवादी पक्षाच्या उमेदवारीसाठी आपला दावा मांडत आहेत.

अखिलेश यादव यांच्यासमोर दुहेरी आव्हान

पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांत अखिलेश यादव यांच्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत.'आयाराम' नेते विरुद्ध जुने निष्ठावान कार्यकर्ते: सहारनपूरमध्ये, टिंकू अरोरांसारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी 'बाहेरच्या' उमेदवारांना दिलेल्या प्राधान्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलेत. अनेक वर्षांपासून पक्षासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांची निष्ठा टिकवून ठेवणे हे नेतृत्वापुढील एक मोठे आव्हान आहे.

तिकीटचं आश्वसन : बाहेरून येणारे नेते ठोस निवडणूक आश्वासनाशिवाय पक्षात सामील होण्यास कचरत आहेत, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेतृत्व सध्या कोणतीही पूर्वअट न ठेवता नवीन सदस्यांना पक्षात सामील करून घेण्याची रणनीती राबवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

SCROLL FOR NEXT