उत्तर प्रदेशामध्ये पोलिस विभागात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. सरकारने पत्रक काढत रात्री 9 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे. या बदलीमध्ये संभलचे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांचाही समावेश असून त्यांच्यावर आता बिजनौरच्या एसपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तसेच गोंडा, सुलतानपूर, मेरठ, झांसी, बिजनौर आणि बलरामपूर या जिल्ह्यांमधील पोलिस अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. 2014 बॅचचे IPS अधिकारी विनीत जायस्वाल यांची गोंडाच्या पोलिस अधीक्षक पदावरून बदली करण्यात आली आहे. आता ते सुलतानपूरमधील पोलिस विभागाची जबाबदारी सांभाळतील. त्याच बॅचचे IPS अधिकारी चारू निगम यांची सुलतानपूरच्या एसपी पदावरून बदली करून लखनऊ येथील यूपी-112 च्या पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
2015 बॅचचे IPS अविनाश पांडे यांची मेरठच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक पदावरून बदली करण्यात आली आहे. त्यांना लखनऊ येथे पोलिस महासंचालक, उत्तरप्रदेश मुख्यालयाशी पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याच बॅचचे IPS बी.डी.जी.टी.एस मूर्ती यांची झांसीच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक पदावरून मेरठच्या वरिष्ठ अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आतापर्यंत बिजनौरचे एसपी असलेले अभिषेक यांची गोंडा जिल्ह्याच्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2017 बॅचचे IPS विकास कुमार यांची बलरामपूरच्या एसपी पदावरून झांसीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. 2018 बॅचचे IPS कृष्ण कुमार बिश्नोई यांची संभलच्या एसपी पदावरून बिजनौरच्या एसपीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी बाराबंकीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास चंद्र त्रिपाठी यांची संभलच्या नव्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरदोईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मातंड प्रकाश सिंह यांची बलरामपूरच्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.