Uttar Pradesh Crime saam tv
देश विदेश

Bahraich Crime News: धुमधडाक्यात लग्न पण पहिल्याच रात्री विपरीत घडलं! पती- पत्नीचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा..

Newly Wed Couple Dead On First Night: एका रात्रीत घडलं भयंकर; लग्नघर बुडाले शोक सागरात.. नवदांपत्याचा मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे...

Gangappa Pujari

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुहागराजच्या सेझमध्ये एका नवविवाहित जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्या घरात नव्या सुनेच्या आगमनाचा आनंद साजरा होत होता, तेच घर अचानक शोक सागरात बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे कारण समजेल.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कैसरगंजमधील गोदहिया क्रमांक चारचे आहे. गोधिया क्रमांक चारमध्ये राहणाऱ्या प्रतापचा विवाह मंगळवारी (३० मे) रोजी गुल्लानपुरवा गावात राहणाऱ्या पुष्पा यादवसोबत झाला होता. मोठ्या थाटामाटात लग्नाची मिरवणूक वधूच्या दारात पोहोचली. अगदी धुमधडाक्यात लग्नाचे सर्व विधी पार पडले. त्यानंतर बुधवारी नववधूला आनंदात वराने आपल्या घरी आणले.

रात्री नवविवाहित जोडपे झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर आज सकाळी बराच वेळ होऊनही त्यांच्या खोलीतून कोणीही बाहेर न आल्याने कुटूंबियांना संशय आला. त्यामुळेच खिडकीतून खोलीत पाहिले असता दोघेही बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. (Latest Marathi News)

त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता दोघेही मृतावस्थेत पडलेले दिसले. या भयंकर प्रकाराने लग्न घरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती तात्काळ मुलीच्या घरच्यांना देण्यात आली. दरम्यान, सध्या पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (Uttar Pradesh Crime)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT