Train Accident
Train Accident Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh : रीलचा नाद जीवावर बेतला; भरधाव ट्रेनच्या धडकेत तरुणीसह तिघांनी गमावला जीव

Satish Daud-Patil

गाझियाबाद : सध्याच्या तरुणांमध्ये रील बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर (Social Media) रील बनवून प्रसिद्ध होण्याच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात टाकतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातील गाझीबाद शहरातून समोर आली आहे. रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणीसह दोन जणांचा ट्रेनच्या धडकेत मृत्यु झाला आहे. ही घटना बुधवारी (१४ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास घडली. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास मसुरी पोलिस स्टेशन हद्दीतील कल्लू गढी (Uttar Pradesh) रेल्वे गेटजवळ एक तरुणी आणि दोन तरुण ट्रॅकवर उभे राहून रील बनवत होते. तिघेही रील बनवण्यात इतके मग्न झाले होते की रेल्वे रुळावर ट्रेन आल्याचेही त्यांना जाणवले नाही.

अखेर काही कळण्याच्या आत भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेनने या तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही मृत्यु झाला. दरम्यान, या घटनेचीमाहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

मृत्युमुखी पडलेल्या तरुणीची तसेच तिच्या इतर दोन मित्रांची ओळख पटलेली नाही. तरुणीचे वय साधारण: २२ ते २५ आणि दोन्ही तरुणांचे वय ३० ते ३५ वर्ष इतके असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या भयंकर घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून रील बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकू नका असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Hair Care Tips: केसांना व्हिटॅमिन ई लावल्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT