Uttar Pradesh News Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News: हॉस्पिटलचे बिल भरायला नव्हते पैसे, गरीब आई-वडिलांनी नवजात बाळालाच विकले

Parents Sold Newborn Baby: प्रसुतीनंतर महिलेला हॉस्पिटलचे बिल देण्यात आले. बिलावरील पैसे पाहून या महिलेला धक्का बसला. इतके पैसे कुठून आणायचे असा प्रश्न या महिलेला आणि तिच्या पतीला पडला. अशामध्ये या दाम्पत्याना त्यांचे बाळ विकण्याचा सल्ला देण्यात आला.

Priya More

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) फिरोजाबादमध्ये (Firozabad) धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांनी आपल्या नवजात बाळाला विकल्याची घटना समोर आली आहे. हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे दाम्पत्यांनी आपल्या बाळालाच विकले. प्रसुतीनंतर महिलेला हॉस्पिटलचे बिल देण्यात आले. बिलावरील पैसे पाहून या महिलेला धक्का बसला. इतके पैसे कुठून आणायचे असा प्रश्न या महिलेला आणि तिच्या पतीला पडला. अशामध्ये या दाम्पत्याना त्यांचे बाळ विकण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांनी बिलाचे पैसे भरायला नसल्यामुळे आपल्या पोटच्या बाळालाच विकले.

आर्थिक विवंचनेत असल्यामुळे पालकांनी आपल्या बाळालाच विकले. पण दलालांनी ठरवलेले पैसे न दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. बाळाच्या आई-वडिलांनी थेट रामगड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी न्यू लाइट हॉस्टिपलमधील डॉक्टर आणि बाळाला विकत घेणाऱ्या ग्वाल्हेरमधील दाम्पत्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या राणीनगर कोटला रोड बाजार समितीजवळ राहणाऱ्या धर्मेंद्र यांच्या पत्नीने १८ एप्रिलला बाळाला जन्म दिला. घराजवळच राहणाऱ्या एका तरुणाने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले आणि न्यू लाइफ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचाराच्या नावाखाली तीन दिवसांचे १८ हजार रुपये बिल केले. मजुरी करणाऱ्या धर्मेंद्रकडे हॉस्पिटलच्या बिलाची ऐवढी रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर रामकुमार आणि दलालांनी त्यांच्या बाळाला विकण्याचे षडयंत्र रचले.

धर्मेंद्रने सांगितले की, 'डॉक्टर आणि दलालांनी त्याला सांगितले होते की जर आमच्या बाळाला मुल होत नसलेल्या दाम्पत्याला दिले तर ते तुमच्या बिलाची रक्कम भरतील. याशिवाय ते अडीच लाख रुपये देखील देतील.' धर्मेंद्र यांना आधीच दोन मुलं होती. त्यामुळे त्याने आपल्या बाळाला विकले. डॉक्टरांनी धर्मेंद्रला ग्वोल्हेर येथील एका दाम्पत्याला बाळ देण्यासाठी तयार केले.

बाळ दिल्याच्या मोबदल्यात धर्मेंद्रला पैसेही मिळणार होते पण ते मिळाले नाहीत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. रामगड पोलिसांनी ग्वाल्हेरला जाऊन बाळाला ताब्यात घेतले. धर्मेंद्रची पत्नी दामिनीला आपले बाळ अडीच लाख रुपयांना विकण्यात आले असल्याचे कळातच तिला मोठा धक्का बसला. पोलिसांनी डॉक्टर आणि बाळाला विकत घेणाऱ्या दाम्पत्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT