Viral  Saam TV
देश विदेश

संतापजनक! रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलगी मागत होती मदत, मात्र जमलेली गर्दी फोटो काढण्यात व्यस्त

साम टिव्ही ब्युरो

कन्नौज : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौजमध्ये दिवाळीच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिरवा परिसरात पिगी बँकेत खरेदीसाठी गेलेली १२ वर्षीय मुलगी शासकीय अतिथीगृहाच्या आवारात संशयास्पद स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. मात्र तेथे जमलेली गर्दी मुलीला मदत करण्याऐवजी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढण्यात व्यस्त असल्याचं दिसलं.

पोलीस अधीक्षक कुमार अनुपम सिंह यांनी सांगितले की, तिरवा पोलीस स्टेशन क्षेत्रातील एका गावात राहणारी मुलगी गेल्या रविवारी पिगी बँक खरेदी करण्यासाठी घरातून निघाली होती, परंतु ती परतली नाही. मुलगी परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. त्यांनी सांगितले की, रविवारी रात्री तिरवा परिसरात असलेल्या एका सरकारी गेस्ट हाऊसच्या रक्षकाने मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहिली तेव्हा त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली.  (Breaking Marathi News)

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात नेले, तेथून तिला कानपूरला पाठवण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांनी वेदनांनी आक्रोश करत असलेल्या मुलीला घेरलं आहे आणि तिला मदत करण्याऐवजी तिचा व्हिडीओ बनवत आहेत.

व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी मुलीला उचलून रुग्णालयात नेण्यासाठी ऑटोरिक्षामध्ये बसवताना दिसत आहे. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मुलीवर उपचार सुरू असून तिच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे सध्यातरी अत्याचाराच्या शक्यतेबाबत काहीही सांगता येत नाही. गेस्ट हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती एसपींनी दिली आहे. त्यापैकी एकामध्ये तरुणी तरुणाशी बोलताना दिसत आहे. आता त्या तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मुलीवर बलात्कार झाला आहे की नाही हे सांगता येणार आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फुटेजमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचा लवकरच शोध घेतला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT