Train Cancelled Saam TV
देश विदेश

Train Cancelled: अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन तडकाफडकी रद्द; काहींचे मार्ग वळवले, कारण काय?

Ayodhya Journy Train Cancelled: अशात अयोध्येत जाणाऱ्या भक्तांची नाराजी वाठढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने अयोध्या रुटवरील सर्व ट्रेन ७ दिवसांसाठी रद्द केल्यात.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh:

अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारीला रामलल्ला मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. गाव खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण दिवाळी साजरी करण्याची तयारी करत आहेत. आपल्या गावाहून अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघालेत. अशात अयोध्येत जाणाऱ्या भक्तांची नाराजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने अयोध्या रुटवरील सर्व ट्रेन ७ दिवसांसाठी रद्द केल्यात.

रेल्वे मार्गिकांचे दुहेरीकरण आणि विद्युत लाईनचे काम सुरू असल्याने अयोध्येला जाणाऱ्या ट्रेन १६ ते २२ जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. यामध्ये वंदे भारतसह अन्य १० ट्रेन रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे दून एक्सप्रेससह ३५ ट्रेन दुसऱ्या रुळांवरून वळवण्यात येणार आहेत. तसेच अन्य १४ ट्रेनचे मार्ग देखील वळवण्यात आलेत.

२२ जानेवारीपर्यंत वंदे भारत ट्रेन रद्द

अयोध्या कॅन्ट ते आनंद विहारपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस १५ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली होती. ही तारीख आता आणखी वाढवली असून २२ जानेवारीपर्यंत ट्रेन रद्द असणार आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या रेल्वे विभागाचे दुहेरीकरण प्राधान्याने केलं जात आहे, अशी माहिती उत्तर रेल्वे लखनौ विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक रेखा शर्मा यांनी दिली आहे.

कामामुळे या मार्गावर सुरू असलेली 04203/04204 क्रमांकाची ट्रेन १६ जानेवारीपासून ते २२ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच अयोध्या कँटवरून धावणारी आणि वेगवेगळ्या स्थानकांवर थांबणारी लखनऊ मेलची सेवा देखील रद्द राहणार आहे.

जर तुम्ही अयोध्येला जाण्याचा प्लान केला असेल तर त्या आधी प्रवासी हेल्पलाइन नंबर १३९ डायल करून अधिक माहिती मिळवू शकतात. किंवा enquiry.indianrail.gov.in वर ट्रेनचे तपशील देखील तपासू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? हे घरगुती उपाय करा

SCROLL FOR NEXT