उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एटा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग-91 च्या सुन्ना कालव्याच्या पुलावर भरधाव कारने दुभाजकाला जोरादर धडक दिली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहे. कारमधील सर्वजण लग्नासाठी गावाकडे निघाले होते. त्याचवेळी ही भीषण अपघाताची घटना घडली. मृतांमध्ये नवरदेवासह ४ जणांचा समावेश आहे. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील सर्वजण दिल्लीवरून मैनपुरीला जात होते. राष्ट्रीय महामार्ग-91 च्या सुन्ना कालव्याच्या पुलावर येताच चालकाचा कारवरील ताबा सुटला. कारने दुभाजकाला धडक दिली आणि रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये नवरदेव, त्याच्या दोन भाची आणि एका मित्राचा मृत्यू झाला. 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
कुलदीप नावाच्या तरूणाचे येत्या २६ एप्रिल रोजी लग्न होते. लग्नासाठीच कुलदीप कुटुंबासह दिल्लीहून मैनपुरीला जात होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, कुलदीप आणि रवी दिल्लीत खासगी नोकरी करत होते. दोघांचेही कुटुंब दिल्लीत एकत्र राहत होते. कुलदीपचे कुमकुमसोबत 5 महिन्यांपूर्वीच लग्न ठरले होते. 24 एप्रिलला लग्न होणार होते.
कुलदीपच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, बुधवारी कुलदीपने कुटुंबासह वधू-वरांच्या पार्टीसाठी साड्या, दागिने, कपडे खरेदी केले. त्यानंतर आम्ही सर्वजण गुरुवारी सकाळी मैनपुरीला रवाना झालो. त्याच्यासोबत त्याचा मित्र गुलशनही होता. गुलशन हा देखील मैनपुरीचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये कुलदीप (21 वर्षे, रा. मैनपुरी), त्याची भाची नित्या (1 वर्षे), आराध्या (6 वर्षे) आणि त्याचा मित्र गुलशन (23 वर्षे) यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.