education news  saam tv
देश विदेश

NCERT Syllabus Change: विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातून 'मुघल साम्राज्या'चा इतिहास होणार गायब, जाणून घ्या काय आहे कारण

NCERT Drops Mughal Empire History : विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातून 'मुघल साम्राज्या'चा इतिहास होणार गायब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

NCERT : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातून मुघल साम्राज्याशी संबंधित प्रकरण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. एनसीईआरटीच्या या निर्णयामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशातील 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघल इतिहासाचे धडे काढून टाकण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकांमधून इस्लामचा उदय, संस्कृतींचा संघर्ष आणि औद्योगिक क्रांती यावरील धडे देखील काढून टाकण्यात आले आहे. यावरून वाद वाढल्याचं पाहता एनसीईआरटीच्या प्रमुखांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

या प्रकरणी स्पष्टीकरण देत एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी म्हणाले आहेत की, हे चुकीचे आणि खोटे आहे. मुघल साम्राज्याचा इतिहास वगळण्यात आलेला नाही. कोविडनंतर अभ्यासक्रम कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कारण मुलांचा ताण कमी व्हावा. तज्ञांनी अभ्यासक्रम कमी केला आहे, इतर काही नाही. इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रम तज्ज्ञांनी पाहिला आणि जे गरजेचं नाही ते वगळण्यात आलं आहे. (Latest Bike News)

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. यावर बोलताना दिनेश सकलानी म्हणाले की, बारावीतही मुघल इतिहासाचा अभ्यास सुरूच राहणार आहे. फक्त ज्या माहितीची पुनरावृत्ती झाली आहे, ते वगळण्यात आलं आहे. मुघलांच्या धोरणासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. इतिहासाशी कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मात्र दोन धड्यांऐवजी फक्त एकच धडा शिकवला जाणार आहे. (Uttar Pradesh Latest News)

इतिहासाच्या पुस्तकांमधून हे धडे काढले जातील

एनसीईआरटीच्या बारावीच्या 'थीम ऑफ इंडियन हिस्ट्री 2' या पुस्तकातील 'किंग्स अँड क्रॉनिकल्स: द मुगल कोर्ट' हा धडा अभ्यासक्रमातून काढून टाकला जात आहे. यासोबतच थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री या इयत्ता 11वीच्या पुस्तकातून 'सेंट्रल इस्लामिक लँड्स', 'कॉन्फ्रंटेशन ऑफ कल्चर्स' आणि 'द इस्लामिक रिव्होल्यूशन' हा धडाही काढला जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT