Uttar Pradesh Crime  Saam Tv
देश विदेश

Crime News: घृणास्पद! नग्न करून मारहाण, लघवी प्यायला लावली, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार

Uttar Pradesh Crime News: उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन मुलाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले खरं पण तिथे आरोपींनी त्याच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. बस्ती येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आले आहेत. या मुलाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले खरं पण तिथे आरोपींनी त्याच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. आरोपींनी त्याला विवस्त्र करून मारहाण केली. लघवी प्यायला लावली, थुंकी चाटायला लावली आणि याचा व्हिडिओ तयार केला.

पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली मात्र पोलिसांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. त्यामुळे दुखावलेल्या पीडित मुलाने आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह थेट पोलिस ठाण्यात नेला. मात्र पोलिसांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी मुलाचा मृतदेह घेऊन एसपी कार्यालय गाठले.

मिळालेल्या माहितीनुसार, बस्तीच्या कप्तानगंजमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून एका मुलासोबत अमानुष कृत्य केल्याने अस्वस्थ झालेल्या या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या मुलाला आरोपींनीकपडे काढायला लावले, त्याला मारहाण केली आणि लघवी प्यायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा व्हिडिओही आरोपींनी बनवला होता. पीडित मुलाने त्यांना व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितल्यावर आरोपीने त्याला थुंकी चाटण्यास सांगितले.

या घटनेप्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलाच्या मामाच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध मारहाण, हिसां करत अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. आत्महत्या केलेला मुलगा संत कबीरनगर जिल्ह्यातील बेल्हार कला भागातील किशोर कप्तानगंज भागात आपल्या मामाच्या घरी राहत होता. तो दहावीचा विद्यार्थी होता. त्याच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबरच्या रात्री त्याला गावातील काही तरुणांनी वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावून घेतले होते.

आरोपींनी पीडित मुलाला त्याचे कपडे काढायला लावले, मारहाण केली, लघवी प्यायला लावली आणि त्याचा व्हिडिओ बनवला. कसातरी निसटून पीडित मुलगा घरी आला. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यानंतर कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी दोन आरोपींना पकडले पण संध्याकाळी सोडून दिले.

या घटनेनंतर मन दुखावलेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी मृतदेह घेऊन पोलीस ठाणे गाठून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांना मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवायचा होता, तेव्हा कुटुंबीयांनी मृतदेह एसपी कार्यालयात नेला. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला शांत केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT