Man Dies While Dancing  saam tv
देश विदेश

Man Dies While Dancing : नाचता नाचता तरुणाचा मृत्यू; 45 सेकंदांचा मन सुन्न करणारा VIDEO, शेवट तर भयंकर

Viral Video : एटामध्ये एक तरुण आपल्या मेहुणीच्या लग्नात नाचत असताना अचानक खाली पडला.

साम टिव्ही ब्युरो

Viral News : उत्तर प्रदेशच्या एटामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या वरातीत नाचता नाचता तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एटामध्ये एक तरुण आपल्या मेहुणीच्या लग्नात नाचत असताना अचानक खाली पडला. तिथेच तयांचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे तरुण खाली पडल्यानंतरही त्याचा मृत्यू झाल्याचं उपस्थितांना कळालं नाही. तरुण खाली पडल्यानंतरही अनेकज नाचत राहिले. काही वेळाने लोकांच्या लक्षात आले, त्यानंतर लग्नघर शोकाकूल झालं.

एटाच्या राजा नगरातील रामपूर गावात राहणारा संजय वर्मा शुक्रवारी शाहजहांपूरच्या गोकुलपुरा गावात गेला होता. त्याचा भाऊ रणजितच्या मेहुणीचे लग्न याच गावात होते. या लग्नातील तरुणाच्या डान्सचा काही सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

संजय वारंवार जमिनीवर पडून डान्स करताना व्हिडीओत दिसत आहे. पण नंतर उठतो आणि नाचू लागतो. यानंतर थोड्याच वेळात संजय अचानक तोंडावर पडला आणि नंतर परत उठलाच नाही. डॉक्टरांनी संजयला मृत घोषित केलं आणि मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आहे. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: वैभव सूर्यवंशीला काव्याकडून घड्याळ गिफ्ट? पुढच्या वर्षी वैभव हैद्राबाद संघातून खेळणार?

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT